रविवार, ११ डिसेंबर २०११
खरं तर या आठवड्यात हिटलरच्या एके काळच्या साम्राज्यात म्हणजे बर्लिन, जर्मनीला जायचे ठरवले होते. पण व्यवस्थित माहिती न काढल्या कारणाने आणि 'जायचे' की 'नाही जायचे' या निर्णयाच्या द्वंद्व युद्धामध्ये 'नाही जायचे' या निर्णयाने बाजी मारल्याने बर्लिनला जाण्याची योजना / प्रस्ताव रद्द केला. बर्लिनचा प्रस्ताव रद्द ऐकल्याने आता कुंभकर्ण स्वरूप निद्राधीन होण्याचे ठरवल्याने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत थोडसं लिखाण करून घेतलं आणि निद्राधीन झालो. शनिवारी मध्यान्हाच्या वेळेला उठून पहिला पैसे वाचवायची कामे करून घेतली. उदा: बँकेचे सगळे व्यवहार, बँकेच्या खात्यावरील जमाखर्चाचा तपशील माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजालावरून करण्यासाठीची व्यवस्था करून घेतली. यामुळे प्रति महिना ५ फ्रँक्स् वाचणार आहेत. आणि दुसरं काम म्हणजे हैद्राबादमध्ये असताना माझ्या नावावर कंपनीमार्फत झालेल्या खर्चासंदर्भातील कामे करून घेतली. (मध्यमवर्गीय जीव आहे हो, समजून घ्या ... थोड्याश्या आळसाचा जबरदस्त फटका बसण्याची शक्यता असते म्हणून आपलं ...)
अख्खा शनिवार असली कामं करण्यात आणि घरच्यांशी, ओळखीच्यांशी बोलण्यातच गेला. उद्या कुठे जायचे हे अजून काही ठरवले नव्हते. मग म्हंटलं चला तितलिसला जाऊयात. तितलिसबद्दल असं ऐकलं होतं की इथे अगदी उंचावर जाण्यासाठी ३ रोप वे बदलावे लागतात, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे, इथे हिंदीमध्ये तितलिस की पहाडीयो पे आपका स्वागत है| असे लिहिले आहे वगैरे वगैरे ... स्वीत्झर्लंड मधील सगळी पर्यटन स्थळं तेथील हवामानावर अवलंबून आहेत म्हणून पहिला माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजालावर जाऊन तितलिसचे उद्याचे / रविवारचे हवामान पाहून घेतलं. सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हवामान उत्तम (पण अति उत्तम नाही). माझा सहकारी संजय सिंगला विचारले की तितलिसला येणार का म्हणून. पण त्याची तब्येत व्यवस्थित नसल्याने तो येणार नव्हता. मग उद्या खरचं असेच हवामान रहावे अशी मनातल्या मनात इच्छा व्यक्त केली आणि झोपलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आठवड्याचे कपडे धुऊन घेतले, आवरून घेतले. वेळोवेळी हवामान पाहत होतो मी कारण उगाच हेलपाटा नको आणि पैसे वाया जायला नको म्हणून. तांदूळ संपले असल्या कारणाने तितलिसला जाताना खायला काय नेणार याचा प्रश्न पडला होता. मग पोट भरून न्याहरी करून घेतली, बरोबर ३ सफरचंद घेतले, आणि साधारण ०९:४५ ला तितलिसला जाण्यासाठी चालत रेल्वे स्थानकावर गेलो. निघायला उशीर तर केला नाही ना म्हणून हुरहूर लागली होती. स्वीत्झर्लंडमध्ये सगळ्या ठिकाणांची माहिती तुम्हाला रेल्वेस्थानकावरून मिळू शकते. २५ नोव्हेंबरपर्यंत तितलिस बंद होते आणि सध्या ते चालू आहे कि नाही हे तपासूनच मला तिकीट देण्यात आले. मी स्वीत्झर्लंडमधील अर्ध्या तिकिटाचा पास काढला असल्याने आणि माझ्याकडे बासेल शहराचा मासिक पास असल्याने माझे अर्ध्या तिकिटाच्या किमतीपेक्षा आणखी १० फ्रँक्स् वाचणार होते. पण २ ठिकाणी रेल्वे बदलावी लागणार होती. मग म्हंटलं ठीक आहे ८८ फ्रँक्स्ऐवजी ७८ फ्रँक्स् मध्ये काम होतंय आणि १० फ्रँक्स् = ५०० रु. वाचताहेत.
१०:०१ च्या रेल्वेने मी प्रवासास सुरुवात केली. उगाच घोळ / लोचे नको म्हणून योग्य त्याच रेल्वे मध्ये बसलो आहे ना हे तपासून घेतले. आता फोटो काढायला कोणी नाही म्हणून स्वतः स्वतःचे काही फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
बाहेर पाहिले तर हवामान अतिशय उत्तम होते आणि असचं हवामान तितलिसला हि असावं अशी मी मनोमन पार्थना करीत होतो. १०:४० वाजता मी ऑल्टेन / Olten ला पोहचलो. ०९ मिनिटात दुसरी रेल्वे. तिथून लुझर्न / Luzern ला ११:३० वाजता पोहचलो. इथे ३६ मिनिटे थांबावे लागले तितलिससाठीच्या रेल्वे साठी. मग चला म्हंटलं पोटातील अनावश्यक पाण्याची टाकी खाली करून घ्यावी आणि स्वच्छतागृहाची शोधाशोध केली. है साला २ फ्रँक्स् = १०० रु. नको, म्हंटलं आता रेल्वेमध्येच. मागच्या वेळेला पॅरीस (फ्रान्स) ला जाताना पर्याय नसल्याने १.५ फ्रँक्स् = ७५ रु. विसर्जित करावे लागले होते पण यावेळेला नाही म्हणजे नाही. मग १२:०६ वाजता तितलिसकडे प्रस्थान केले. रेल्वे निघून अजून ५ मिनिटे झाली नाहीत तर हे अप्रतिम निसर्ग सौंदर्य. माझ्या जवळपासच्या आसनांवर चीनी समूह बसला होता. असं म्हणूयात कि सर्व वयोगटातला (छोटा गट सोडून) - युवा पिढी, प्रौढ पिढी, आणि म्हतारपणाकडे झुकत चाललेली पिढी. या समूहातील एक मुलगी सुंदर दिसत होती - सुंदरतेपेक्षा तिच्यामध्ये फिरण्यासाठीचा उस्ताह दाटून भरला होता. नाही तर नुसतं सौंदर्य असून काय उपयोग जर त्याला उस्ताहाची जोड नसेल तर ... आणि माझ्या मागील बाजूला दुसऱ्या दिशेला नुकतच लग्न झालेलं जोडपं बसलं होतं. नुकतच लग्न झाल्यानंतरचं एखाद्या जोडीचं बोलणं, हावभाव, आणि इतर बाबी / गोष्टी ... अगदी तसचं ह्यांचही चालू होतं. यांच्या तोंडून मराठी आवाज ऐकला - बर वाटलं. किमानपक्षी मधुचंद्राच्या बाबतीत तरी परदेशात जाऊन मराठी पाऊल पुढे पडतंय, जरी इतर बाबतीत मागे पडत असलं तरी ... असोत ...
मग जसं जमलं तसं कॅमेऱ्याचे फोटो काढण्याचे बटण कचाकचा दाबत काही फोटो काढून घेतले. याच दरम्यान चीनी समूह अचानक रंगात आला होता. माझ्यासमोरील चीनी माणसाकडे अतिशय छोट्या अक्षरात लिहिलेलं अतिशय छोट्या आकाराच किशात सहज बसेल असं एक पुस्तक होतं. आतापर्यंत मी संग्रहालयांमध्येच अशी पुस्तके पाहिली होती. आज हे दृश्य समोर पहायला मिळाले. बरचसं अंतर गाढल्यानंतर एक बोगदा लागला आणि तो काही संपता संपेना. हा बोगदा कदाचित चढण असणारा होता. अगदी तितलिसच्या पायाथ्याजवळच्या रेल्वेस्थानकाच्या अलीकडे तो बोगदा संपला.
१२:५३ वाजता पोहचल्यावर चौकशी केंद्रात चौकशी केली आणि आईस फ्लायर / Ice Flyer चे तिकीट काढले. वरती तितलिसला पोहचल्यावर हे तिकीट वापरावे लागते. मग बाहेर आल्यावर रेल्वेमधील भारतीय जोडप्याशी बोलणे झाले. ते जोडपं मराठी निघालं. कुठले? - महाराष्ट्र - उमरगा, मी सोलापूर ... म्हणजे आम्ही जवळपास गाववालेच. सोलापूर ते उमरगा अंतर ११० कि.मी. आहे. मग थोडेफार ओळखीपाळखींवर बोलणे झाले - उमरग्याचे राजकारणी बाबा पाटील, त्यांचे भाऊ रवी पाटील हे माझ्या आईचे सख्खे आत्येभाऊ वगैरे वगैरे ...
आमचे असे बोलणे चालू असताना आम्हाला तितलिसच्या पायथ्याला घेऊन जाणारी बस आली. बसमधून तितलिसच्या पायथ्याला आलो. इथून साधारण उंची असलेले बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. मग पुढे रोप वे ने आणि या प्रेमी युगुलाच्या मध्ये कबाब मी हड्डी नको म्हणून मी आपला वेगळ्या डब्यात बसलो.
रोप वे मधून निघालो रे निघालो सगळीकडे बर्फच बर्फ, बर्फांचे डोंगर, अगदी निसर्गरम्य वातावरण. मग कचाकचा काही फोटो काढून घेतले. थोड्या वेळाने या रोप वे तून उतरून दुसऱ्या रोप वे मध्ये - पुन्हा सगळीकडे बर्फ, बर्फ आणि फक्त बर्फ ... फोटो काढीत असताना अधून मधून मी यांनी हे कसे साधले असेल, भौतिक शास्त्राचा उपयोग कसा आणि कुठे कुठे केला असेल वगैरे वगैरे वर विचार करीत होतो. इथून पुढे हा रोप वे सोडून सगळ्यांसाठी एकच रोटेटर केबिन. यामध्ये रोप वे चा डबा जसजसा पुढे जातो तसतसे याचा खालचा भाग फिरत राहतो आणि तुम्हाला सभोवतालचा परिसर सर्व बाजूंनी पाहता येतो.
तितलिसला वरती पोहचल्यावर स्कीइंग / Skiing करण्यासाठी आलेले बरेच जण होते. प्रौढ, तरुण - तरुणी, लहान मुले - एकदम उस्ताही. पोहचल्या पोहचल्या आईस पॅलेस पाहून घेतले. ते पाहून झाल्यावर आम्ही तितलिसच्या मुख्य ठिकाणी गेलो. वातावरण अगदी अप्रतिम होते. मायाजालावर दाखविलेल्यापेक्षा खूपच छान होते. मग आम्ही एकमेकांचे फोटो काढून घेतले. आणि याच वेळेला मधुचंद्रासाठी आलेले आणखी एक महाराष्ट्रीयन जोडपं भेटलं आणि त्यांनी फोटो काढण्यासाठी मला विनंती केली. मग जय महाराष्ट्र ची घोषणाबाजी झाली आणि हे उमरग्याचे जोडपं आणि हे मुंबईचं जोडपं अशी ओळख पटवून देण्यात आली. मग त्यांचे २ फोटो काढले. त्यानंतर त्यांचे अचानक स्कीइंगवाल्या आकृतीकडे लक्ष्य गेले आणि इथेही फोटो काढण्याचे ठरले. मला फक्त व्यवस्थित क्लिक करायचे होते. हा फोटो काढल्यानंतर धन्यवाद! वगैरे म्हणून मुंबईचं जोडपं पुढे गेलं. आता दुसऱ्या जोडप्यालाही इथे फोटो काढायचा होता. म्हणून ते दोघे स्कीइंगवाल्या आकृतीजवळ गेल्यावर त्यांच्या ध्यानात आले कि फोटो दुसऱ्या बाजूने काढायचा आहे म्हणून. मग त्यांचा व्यवस्थित समोरील बाजूने फोटो काढून घेतला. त्यांचा फोटो काढून झाल्यावर मी पहिल्या जोडप्याजवळ जाऊन त्यांना फोटो विरुद्ध दिशेने काढला गेला आहे याबद्दल सांगितले, सगळ्यांनी हसून घेतलं, आणि त्यांचा व्यवस्थित फोटो काढला. जाता जाता अलविदा म्हणताना अतिउस्ताहामुळे असं झालं म्हंटल्यावर दोघेही स्मितहास्य करीत म्हणाले कि - स्वीत्झर्लंडला आले कि असच होणार - :)

असे फोटोसेशन झाल्यानंतर उमरगावासियांनी खाण्यासाठी घेतलं आणि मी आजूबाजूचे फोटो काढून घेतले. मग नंतर मी हि कॉफी घेऊन त्यांच्यामध्ये सामील झालो. दोघांनीही कमी प्रमाणात गरम कपडे घातले होते त्यामुळे त्यांना जरा जास्तीच थंडी वाजत होती. साहेब तर रेल्वे सुटेल म्हणून हातमोजे देखील विसरून हॉटेलवरच ठेऊन आले होते. पोरीला जरा जास्तीच थंडी वाजत होती म्हणून तिने सौम्य बिअर घेतली - वड ... पोराने कॉफी आणि पोरगी बिअर - :) ... मग मला हे गाणं आठवलं - हर किसी को नही मिलता यहा प्यार जिंदगी मे, खुशनसीब हो ... :) ... मग पुढे गप्पा मारता मारता कळलं कि हे दोघे नातेवाईक आहेत आणि हा मुलगा या पोरीचा मामा आहे आणि यांचा प्रेमविवाह आहे. नात्यातली पोरगी असल्यामुळे लग्नामध्ये काही अडचणी नाही आल्या. हा मुलगा युगोस्लावाकीया ला असतो, काही दिवसांच्या सुट्टीवर आला आहे लग्न उरकण्यासाठी वगैरे वगैरे ...
खाणपिणं झाल्यावर आम्ही एकमेकांचे फोटो काढून घेतले.
नंतर आईस फ्लायर ४ वाजता बंद होते म्हणून आम्ही धावत धावत तिकडे गेलो. वाटेत पाहिले तर तिथे २ चित्रे होती - एक आईस फ्लायर आणि दुसरे आईस स्लेजिंग. आईस फ्लाइंग म्हणजे पुन्हा वेगळ्या पद्धतीचा रोप वे कि ज्याला डबा नाही. फक्त पाळण्यात बसल्यासारखे बसायचे आणि चक्कर मारून यायची. मला आईस स्लेजिंग करायची इच्छा होती म्हणून मी आईस फ्लायरवाल्याकडून विचारपूस करून घेतली तर तो म्हणाला कि आईस स्लेजिंग खाली जाऊन दुसऱ्या रोप वे स्थानकावरून करता येते आणि ते हि ४ वाजेपर्यंतच चालू असते. तुम्ही वेळेअभावी दोन्हीपैकी एक करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला आईस स्लेजिंग करायचे असेल तर लवकर निघा. घाई करून आम्ही रोटेटरने रोप वे च्या दुसऱ्या स्थानकावर गेलो आणि तिथे रोटेटरच्या स्त्री चालकाकडे चौकशी केली तर असे कळाले कि, "आईस स्लेजिंग बंद आहे. आईस स्लेजिंगसाठी बर्फाचा जाड थर लागतो आणि तो अजून तयार झालेला नाहीये. आम्ही बर्फाची आतुरतेने वाट पाहत आहोत." मग तिने तेथील इतर ओळखीच्यांना विचारून आईस स्लेजिंगबद्दल विचारपूस केली आणि आईस फ्लाइंग करून १२ फ्रँक्स् वाचवण्याचा सल्ला दिला. या गडबडीत मी उमरागावासियांना अलविदा करू शकलो नाही आणि त्याच रोटेटरने परत वरती गेलो.
वरती पोहचल्यावर पळत पळत आईस फ्लायरजवळ गेलो आणि आईस फ्लाइंगचा अनुभव घेतला. पुन्हा बर्फाच्छादित डोंगर अगदी जवळून पाहत होतो. स्कीइंग करणारी लहान मुले, त्यांचा उस्ताह, त्यांचे कौशल्य हे सगळं काही मी न्याहाळत होतो. आईस फ्लायरमधून उतरल्यावर जवळच एक दगडी सुळका होता तो जणू काही निसर्गाला वाकोल्या दाखवत होता कि मला बर्फाने बुजवून दाखव ना ... मग खाली उतरल्यावर जवळपासच निसर्ग सौंदर्य पाहून घेतलं आणि एका ब्राझील पर्यटकाकडून काही फोटो काढून घेतले. ४ वाजता आईस फ्लायर बंद होते म्हणून ०३:५५ ला मी आणि ब्राझीलवाला पर्यटक भारत आणि ब्राझीलबद्दल गप्पा मारत परतीच्या मार्गाला लागलो. वाटेत पुन्हा काही फोटो काढून घेतले. रोटेटरकडे जाताना एक चीनी समूह दिसला. सगळ्यांमध्ये उस्ताह अगदी दाटून भरलेला होता. मस्त वाटलं - फिरायला येणाऱ्या प्रत्येकाकडे किमानपक्षी असा उस्ताह असावा असं वाटतं मला. मग त्यांना त्यांचा बर्फामध्ये उड्या मारतानाचा फोटो काढून देऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

रोटेटरजवळ आलो तर सगळीकडे चीन आणि भारतच दिसत होता. जिकडे जावे तिकडे चीनी लोक पर्यटन स्थळी भरभरून दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा चलनाचा दर पाहिला तर १ युरो = ८ युआन (चीनी चलन). मग वाटलं कि कदाचित हेच कारण असावे.
मग भारतीय समूहाशी बोलणं झालं. हा समूह भारतीय सरकारतर्फे प्रदूषण नियंत्रणाचा अभ्यास करण्यासाठी आला होता. माझ्यासमोर त्यांनी त्यांच्या समूहाचे काही फोटो काढले. पण कुणीच हसत नव्हते आणि कुणामध्येही उस्ताह जाणवत नव्हता. मग गप्पा मारता मारता मी इथला, मी तिथला अशी विचारपूस झाली. त्यांच्यातील एक जण मुंबईचे होते. मी सोलापूर, महाराष्ट्र म्हंटल्यावर ते मुंबई से आया मेरा दोस्त म्हणून जोरात ओरडले आणि सगळ्यांना सांगायला लागले. त्यांनी त्यांच्या स्वीत्झर्लंडमधील गाईडला देखील माझ्याबद्दल सांगितले. हे सगळं झाल्यावर मी त्यांना म्हंटलं कि एक फोटो काढायचा आहे आणि सगळ्यांनी हसलं पाहिजे. फोटो काढताना हसा म्हंटलं कि सगळ्यांनी चेहरे खुलवले, मुंबईचे काका तर एकदमच जोश मध्ये होते.
०४:१५ - ०४:३० नंतर सूर्य मावळायला लागल्यावर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. मग पुन्हा संध्याकाळच्या वेळेचे निसर्ग सौंदर्य पाहत आम्ही खाली निघालो. रोप वे च्या दुसऱ्या स्थानकावर जिने मला आईस स्लेजिंग बद्दल स्वतः चौकशी करून सांगितले होते तिला पुन्हा एकदा धन्यवाद! म्हणून तिला विनंती करून तिचा फोटो काढून घेतला. मग रोप वे बदलत बदलत निसर्ग सौंदर्य पाहत पाहत फोटो काढत तितलिसच्या पायथ्याला आलो. खाली येताना माझ्या रोप वे च्या डब्यात एक भारतीय होता. तो ६ वर्षांपासून लंडन, इंग्लंड मध्ये आहे. भारतीय असून देखील साहेब हिंदी / मराठी काही बोलायला तयार नव्हते. इंग्लिश एके इंग्लिश! मी त्याच्याशी हिंदीमध्ये बोलतोय पण साहेबांचे उत्तर मात्र इंग्लिशमध्येच. चेहऱ्यावरून तरी मराठी वाटत होता पण म्हंटलं उगाच कशाला चांभार चौकश्या?, जाऊ देत, उसकी जिंदगी ही, ओ कैसे भी जिये|
पायथ्याला आल्यावर ब्राझील पर्यटकाचा व भारतीय समूहाचा निरोप घेतला आणि घराच्या परतीच्या वाटेला लागलो. बसने रेल्वे स्थानक, रेल्वे लागलेलीच होती, आत जाऊन बसलो. माझ्या सीटच्या समोरील बाजूस 'F' लिहिले होते.शेजारच्याला विचारले स्त्रियांसाठी राखीव का? NO, NO way. Till date NO. At least NOT in Switzerland. हा शेजारचा आईस स्कीइंगचा शिक्षक होता. तिथून लुझर्नला आलो. लुझर्नकडे जाताना बोगद्यातून गाडी खूपच सावकाश जात होती - एवढी सावकाश कि सायकलवालाही तिला सहज गाठू शकेल. येताना हि याच रेल्वेने आलो होतो पण येताना लागणाऱ्या आणि जाताना लागणाऱ्या वेळांमध्ये १३ मिनिटांचा फरक होता.
लुझर्नला पोहचलो रे पोहचलो कि ३ मिनिटात बासेलची रेल्वे होती. मी आईस स्कीइंगच्या शिक्षकाला रेल्वेबद्दल विचारून घेत होतो तर तो म्हणाला कि मलाही तिकडेच जायचे आहे म्हणून मी त्याच्याबरोबर निघालो. तो म्हणत होता कि ३ मिनिटात बासेलची रेल्वे निघणार आहे पण मला काही हि माहिती कुठेच दिसायला तयार नाही आणि रेल्वे कुठे लागलीय हे हि कळायला तयार नाही. तो म्हणतोय तर चला त्याच्या मागे. जर हि रेल्वे चुकली तर २० ते ३० मिनिटे थांबावे लागणार होते. स्कीइंगच्या शिक्षकाकडे स्कीइंगचे भरपूर सामान होते आणि त्याची बॅगदेखील होती. आम्ही चालत चालत रेल्वेकडे निघालो होतो आणि एका मिनिटात रेल्वे सुटणार होती. म्हंटलं तुझी बॅग दे माझ्याकडे आणि चल पळत पळत. मग पळत पळत जाऊन रेल्वे पकडली, आम्ही रेल्वे मध्ये चढलो रे चढलो कि रेल्वे निघाली. पण मला शंका होती कि मी योग्य त्या रेल्वे मध्ये बसलोय कि नाही म्हणून. कारण माझे तिकीट ठराविक रेल्वेमध्येच चालणार होते. जाऊदेत म्हंटलं, बघुयात काय होते ते (जरा घाबरतच बर का ...). मग तिकीट तपासणारा आला, त्याला तिकीट दाखवले तर त्याचे काही समाधान होईना. त्याने आणखी काही तिकिटे आहेत का म्हणून विचारल्यावर मी सगळी तिकिटे, रेल्वेचे हाफ कार्ड, बासेलचा मासिक पास अशी सगळी तिकिटांची मालमत्ता दाखवली पण त्याचे काही समाधान झाले नाही. याचे कारण होते मी माझ्या तिकिटासाठी योग्य असणाऱ्या रेल्वेमध्ये बसलो नव्हतो जरी ती रेल्वे बासेलला जाणारी असली तरी. तिकीट तपासणाऱ्याने मला माफ केले आणि दंड केला नाही. जर तिकीट काढले नसेल तर इथे ९० फ्रँक्स् = ४५०० रु. दंड आहे. वाचलो म्हंटलं. २० ते ३० मिनिटे वाचली, ९० फ्रँक्स् वाचले, आणि वाटेत रेल्वे बदलायचे कष्ट आणि वेळ वाचला. मग गप्पा मारता मारता स्कीइंगच्या शिक्षकाचे रेल्वेस्थानक आल्यावर तो निघून गेला. तो जाताजाता त्याच्याकडून इथे रेल्वेचा वार्षिक आणि सहामाही पास असल्याचे कळाले. तो गेल्यानंतर शांत बसून अधून मधून दुसऱ्या बाजूला बसलेल्या सुंदर मुलीकडे पाहत पाहत रात्री ०७:५० ला बासेलला पोहचलो आणि मग चालत घरी.
- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ४ १ ७ ६ ५ १ ० ६ ८ ३ ४)
शनिवार, ३१/१२/२०११
शनिवार, ३१/१२/२०११