बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

इंग्लिश पुराण

matherchot / मादरचोत!!!

थांबा, थांबा, थांबा ... अहो, हि शिवी नाहीये ... थांबा, सांगतो कसे ते ...
मादरचे स्पेलिंग काय? => Mather
मदर (आई) चे स्पेलिंग काय? => Mother

आता तुम्हीच मला सांगा Mother (मदर) आणि Mather (मादर) काही फरक आहे कि नाही? मग matherchot / मादरचोत हि शिवी कशी काय होईल? मग पटतंय ना माझं?

तर ५ वीत असताना मला इंग्लिशच्या 'ग' चा 'गणपती' पण येत नव्हता त्यावेळी गावाकडे माझ्या इंग्लिशच्या तुटपुंज्या (कदाचित चुकीच्या) ज्ञानावर असलं भलतसलतं तत्वज्ञान बरळायचो आणि भांडायचो. पण खरं सांगायचं तर मला या शिवीबद्दल माझचं बरोबर आहे असे वाटते आणि या गोष्टीचे नवल वाटते कि कोणत्या महाज्ञानी माणसाने "मादरचोत" या शब्दाला शिवी बनवले. असोत!!!

आईबाप शिकलेले होते त्यामुळे आम्हा भावंडाना शहरातील शाळेमध्ये शिकायला मिळाले. जर तसे नसते तर कदाचित गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकावे लागले असते. जिल्हा परिषदेच्या शाळेची तऱ्हाच अलग. पहिली ते चौथीचे वर्ग एकाच खोलीमध्ये भरणे, एकच मास्तर सगळे विषय शिकवणे, वगैरे वगैरे ... असे प्रकार असायचे. आमच्या गावाकडे "तानसिंग बाबुराव हुंडेकरी" नावाचा एक पोट्टा होता तर या साहेबांनी पाचवी ओलांडल्यानंतर स्वतःचे नाव "तन्नू बम्बई हडकरी" असे लिहिले होते म्हणे. मला तरी वाटते कि अशाच एखाद्या तऱ्हेवाइकाने "matherchot / मादरचोत" या शब्दाला शिवी म्हणून प्रसिद्धी दिली असेल.

मी जून १९९२ साली हरीभाई देवकरण प्रशालेमध्ये इयत्ता ५ वी प्रवेश घेतला. ५ वीला "इंग्रजी" विषय नवीनच. आम्हाला त्यावेळी "लिमये" बाई "इंग्रजी" शिकवायला होत्या. बाई इंग्लिश चांगल्या शिकवायच्या पण आम्हा मराठी बाणा असलेल्या टाळक्यांना थोडथोडकं च समजायचं. बाई जाम भारी दिसायच्या त्यामुळे सुरुवाती सुरुवातीला आमचं सगळं लक्ष्य तिकडेच. त्यात बाईंच्या कपाळाला ना टिकली ना गळ्यात मंगळसूत्र. तर मग सुरुवातीचे काही दिवस आमच्या चर्चेचा विषय काय तर बाईंचे मिस्टर वारले असतील नाही तर बाईंचा घटस्फोट झाला असेल. पण बाईंनी त्यांच्या शिकवण्याने आम्हा सगळ्यांना जिंकलं मग हे असलं सगळ बंद झालं. आणखी एक म्हणजे या बाई इतर शिक्षकांप्रमाणे माज नाही करायच्या.

त्यावेळी 'a ' आणि 'g' या अक्षरांच्या आपल्या लिहिण्याच्या पद्धतीबद्दल आणि पाठ्यपुस्तकातील लिहिण्याच्या पद्धतीबद्दल नवल वाटायचे. काही दिवसांनी पहिली चाचणी परीक्षा झाली. सर्वजण पहिल्यांदाच इंग्लिश शिकत होते त्यामुळे १० गुण वर्गातील कामगिरीसाठी (प्रगतीसाठी) राखून ठेवलेले असायचे आणि २० गुणांची परीक्षा. मला वर्गातील कामगिरीबद्दल ९ गुण मिळाले आणि लेखी पेपरमध्ये १८ गुण मिळाले. लेखी पेपरमधला शेवटचा प्रश्न होता - खाली दिलेल्या शब्दांचे अनेकवचनी शब्द लिहा. शब्द - १. dog २. box ... त्यावेळी मला दोन्हींची उत्तरे येत नव्हती. समोरच्याला विचारले, त्याने सांगितले कि त्या शब्दांना 's' लाव. मग dog  चे dogs केले आणि box चे boxs केले. काही दिवसांनी गुण कळाले. मग आमच्या बाईंनी box चे boxes होते असे सांगितले. कारण काय तर इंग्लिशमधील एक नियम - जेंव्हा एखाद्या शब्दाच्याशेवटी 'x' येतो तेंव्हा त्या शब्दाचे अनेकवचन करताना त्या शब्दाच्याशेवटी 's' ऐवजी 'es' लावतात (आमच्या मायभाषेचे नियम कधी लक्षात ठेवले नाहीत आणि या परक्या भाषेचे नियम कुणी लक्षात ठेवावेत).  त्यावेळी मला असे वाटून गेले होते कि हे मास्तर लोक पण ऐन परीक्षेच्या वेळीच का असले खवटे प्रश्न विचारतात.

 ३० पैकी २७ गुण म्हणजे ९० टक्के. हे माझ्या आयुष्यातील इंग्लिश या विषयातील सर्वोत्तम गुण आहेत. त्यानंतर मला कधीही इंग्लिश मध्ये एवढे गुण मिळाले नाहीत. या चाचणी परीक्षेनंतर १० वी पर्यंत ठरलेले कि चाचणी परीक्षेत १८ ते २० गुण मिळवायचे आणि सहामाही व वार्षिक परीक्षेत नापास व्हायचे.

६ वीला आम्हाला इंग्लिश शिकवायला "देशपांडे" मास्तर होते. या मास्तरला  एकदा सगळ्या पोरापोरींनी सर सर गोष्ट सांगा म्हणून विनंती केली तर या पठ्ठेबापुरावांनी काय गोष्ट सांगितली असेल - "एक होती चिमणी आणि एक होते ज्वारीच्या धान्याचे गोदाम. चिमणी आली तिने पहिला दाना उचलला आणि परत गेली. पुन्हा आली, दुसरा दाना उचलला, आणि परत गेली. पुन्हा आली, आणखी एक दाना उचलला, आणि परत गेली... पुन्हा पुन्हा तेच तेच ...". तर असा ह्यो आमचा मास्तर.

एके दिवशी या मास्तरने आम्हाला स्वतःचे नाव लिहायला सांगितले. मी माझे नाव खालीलप्रमाणे लिहिले.
अमर => amr ... ('अ' साठी 'a', 'म' साठी 'm', आणि 'र' साठी 'r')
वर्गात बऱ्याच पोरांनी अशा पद्धतीनेच स्वतःची नवे लिहिली होती. मग मास्तरने सांगितले - मध्ये मध्ये 'a' घालायचा. शेवटी 'a' ची गरज नाही.

पुढे आता आडनाव लिहा.
गायकवाड => gayakawad
मास्तरला दाखवले तर मास्तर म्हणाला असे लिहायचे नसते. गायकवाड चे स्पेलिंग Gaikwad लिहायचे. आता 'य' साठी 'i' का आले आणि का घेतात ते आजपर्यंत मला कळाले नाही. असतील बुवा इंग्लिशचे काही नियम म्हणून गप्पा बसायचे बाकी काय. जे झेपेल ते शिकायची असली विचारसरणी. मास्तरने सांगितले ना गायकवाड चे स्पेलिंग "Gaikwad" लिहितात मग झालं तर ... इथून पुढे मी पण तेच स्पेलिंग लिहायला लागलो. देशपांडे मास्तर झिंदाबाद!!!
(या आगोदर इंग्लिशमध्ये आडनाव लिहायचा प्रसंग आला नव्हता.)

तुम्हाला नवल वाटेल कि, परीक्षेच्यावेळेस इंग्लिशच्या पेपरचे टेन्शन घ्यायचे कि नाही हे पण कळत नव्हते मला त्यावेळी. वाचले तर काही कळत नव्हते आणि झेपायचे पण नाही. आता कळणारच नाही तर मग टेन्शन काई को लेने का रे ... सहामाही आणि वार्षिक परीक्षेत समानअर्थी, विरुद्धअर्थी शब्द लिहा असे ढिगाने प्रश्न असायचे. हे पण मला नाही जमायचे. परीक्षेच्यावेळी आमची बैठक व्यवस्था पोरं कॉप्या करू नये म्हणून दुसऱ्या इयत्तेच्या पोरांबरोबर असायची. मी जवळजवळ सगळा पेपर शेजारच्या पोरालाच विचारून लिहायचो/सोडवायचो. मी तर सुरुवातीपासूनच शेजारच्याला त्रास देत होतो. पण लोचा असा व्हायचा कि हे समानार्थी, विरुद्धअर्थी चे प्रश्न प्रश्नपत्रिकेच्या शेवटी असायचे आणि मग शेजारच्या पोराला विचारायला लाज वाटायची. आणि यात कहर म्हणजे "Synonyms" ला "समानार्थी" म्हणतात आणि "Antonyms" ला "विरुद्धार्थी" म्हणतात हे मला त्यावेळी माहित नव्हते. मला त्यावेळी ह्या असल्या प्रश्नांची उत्तरे पण एकदोन वाक्यात द्यायची असतात असे वाटायचे. मग मला जसे काही या प्रश्नाचे उत्तर जमू शकेल म्हणून मी जरा घाबरत घाबरत केविलवाणा चेहरा करून शेजारच्याला विचारायचो - "अरे Synonyms आणि Antonyms चा अर्थ काय ते सांग, माझे मी त्यांची उत्तरे लिहितो.". तुम्ही मला सांगा ज्या पोराला Synonyms आणि Antonyms चा अर्थ माहित नाहीये तो काय घंटा लिहिणार आहे एखाद्या शब्दाचा समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. मला खरच कळत नव्हते कि तो शेजारचा पोरगा माझ्याबद्दल काय समजत असेल ते. मग शेजारच्या पोरालाच माझी दया यायची आणि तो डायरेक्ट उत्तरच सांगायचा (आणि तेही Synonyms आणि Antonyms चा अर्थ न सांगता [माझ्या आठवणीप्रमाणे]) ... अजून एक कहर करण्यासारखा प्रश्न म्हणजे - 'a', 'an', आणि 'the' च्या गाळलेल्या जागा. मला 'a', 'an', आणि 'the' केंव्हा वापरतात हे ८ वीच्या शेवटला कळाले (तुम्हाला कदाचित हे खोटे वाटेल पण जे आहे ते आहे ) ... मग पुढच्या १०० गुणांच्या इंग्लिशच्या पेपराच्यावेळी पुन्हा हेच गाऱ्हान कारण Synonyms आणि Antonyms चे अर्थच माहित नाही ना झाले अजून.

८ वीला अजूनच कहर. ८ वीला घरच्यांनी मला शास्त्र, गणित, आणि इंग्रजीसाठी "केशव शिंदे" यांच्याकडे शिकवणी लावली. या घटकेला मागे वळून पाहिले तर मला शिकवणीची व्याख्या पुढीलप्रमाणे करावीशी वाटते - शिकवणी म्हणजे जर एखादा पाल्य शिकवणीचा सुउपयोग करून घेत नसेल तर त्याच्या आईबापांनी स्वतःच्या मुलाला/मुलीला शाळेत हुल्लडबाजी/दंगा/गोंधळ करण्यासाठी वेळ कमी पडत असावा म्हणून पैसे वाया घालवून केलेली अतिरिक्त सोय. जर "इंग्लिश" पुरता विचार केला तर मी शिकवणीचा इंग्लिशचा दिढ तास हुल्लडबाजी/दंगा/गोंधळ करण्यासाठीच वापरायचो.

इंग्लिशचा तास पहिला असायचा. या तासाला आम्ही गोंधळ घालण्यासाठी मुलींच्या मागे बसायचो. शास्त्र आणि गणिताच्या तासाला पुढे जाऊन बसायचो. इंग्लिश शिकवायला बहुतेक "येवले" मास्तर होते - चश्मेश, थोडेसे कुबड असल्यासारखे. हे आम्हाला व्याकरणातील काळ शिकवत असताना आमचा मागे गोंधळ चालू असे. माझा एक मित्र त्याकाळीपण Walkman घेऊन येत असे आणि headphones शर्टमध्ये लपवून गाणी ऐकत असे. मी हि कधी कधी ऐकत असे. जर त्यावेळी लक्ष दिले असते तर आज माझे इंग्लिश खूप चांगले असते पण ...

येवले मास्तर Monkey, Donkey, Money असे शब्द असलेली वाक्ये घेऊन व्याकरणातील काळ शिकवायचा. Monkey म्हणजे माकड, Donkey म्हणजे गाढव, पण Money म्हणजे काय आणि त्याचे स्पेलिंग काय? मास्तर Monkey चे उदाहरण झाले कि मग Money चे उदाहरण आम्हाला करायला लावत असे. मास्तर Money सांगायचा आणि मी Monkey च लिहायचो कारण मला वाटायचे कि मास्तर Monkey सांगतोय आणि मला Money चे स्पेलिंग हि माहित नव्हते. मास्तरच्या वाक्यात Money आणि I /he /she असायचे पण माझ्या अज्ञानीपणामुळे मी Monkey, I /he /she असे लिहायचो. मनात पाल चुकचुकायाची कि बाबा काही तरी घोळ आहे. दोनतीनदा असे झाल्यावर शेजारच्याच्या वहीत डोकावून पाहिले तर साहेब Money लिहित होते. मग मी पण Money लिहायला लागलो. पण शेजारच्याला त्याचा अर्थ काय ते विचारले नाही कारण उगाच इज्जत कशाला खाऊन घ्यायची स्वतःची. मग कालांतराने Money म्हणजे पैसा हे कळाले. पण शेवटपर्यंत काळ कसे वापरायचे हे काही कळले नाही.

मी त्यावेळी स्टेशन चे स्पेलिंग stashion, पेशंट चे स्पेलिंग pashant असे लिहायचो. एकदा शिकवणीतील इंग्लिश चा शेवटचा पेपर होता. त्यानंतर शिकवणी संपणार होती, मास्तरचा आणि आमचा परत त्यावर्षी संबंध येणार नव्हता. एका प्रश्नाचे उत्तर मला माहित होते. मी मराठीत सांगू/लिहू शकत होतो पण इंग्लिशमध्ये लिहणार कसे? मला गहू, चपाती ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे माहित नव्हते. असा तसा तो शेवटचाच पेपर होता, मास्तरशी पण परत संबंध येणार नव्हता, आणि इंग्लिशमध्ये पेपर पूर्ण न सोडवल्यामुळे सारखेसारखे नापासच होत होतो म्हणून म्हटलं कि त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे. उत्तरपत्रिकेत डायरेक्ट "He eat/ate gavhachi chapati" असल काय काय तोडक्या मोडक्या व्याकरणात लिहून पेपर दिला एकदाचा. शेवटी निकाल काय तर नापासच.

९ वी, १० वीला इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना/pattern बदलला - A, B, C, D, आणि E असे अनुभाग/sections आले. D आणि E मध्ये निबंध आणि पत्र असायचे पण ते काही केल्या मला जमायचे नाहीत म्हणून मी ते दोन अनुभाग सोडूनच पेपर लिहायचो. १० वीला सहामाही परिक्षेत D आणि E अनुभाग न सोडवता ३२ गुण पण सराव परिक्षेत D आणि E अनुभाग लिहून २६ गुण. हे असले आमचे प्रताप.

१० वीला इंग्लिशसाठी ३ शिकवण्या केल्या. पहिले मास्तर (नाव आठवत नाही पण ब्राह्मण होते बर का ...) सगळे धडे मराठीत व्यवस्थित समजावून सांगायचे पण व्याकरणाचे काय? कंटाळा आला, दिली सोडून. पहिली शिकवणी स्पेशल होती बर का. मग नंतर इंग्लिशसाठी एकदम फेमस असलेल्या बत्तुल मास्तराकडे शिकवणी लावली. २ ते ३ दिवस शिकवणी केली पण नंतर मास्तरला जादा शिकवणी घेणे जमेना म्हणून हि पण शिकवणी बंद. पण या मास्तराने पत्र कसे लिहायचे हे लई लई लई भारी पद्धतीने शिकवले होते. ठरलेली ४ ते ५ वाक्ये पत्रात कशी घुसडायची ते त्याने लई भारी शिकवले होते. ह्यो मास्तर नेहमी टोपी घालूनच हिंडायचा सगळीकडे आणि शिकवताना पण टोपी असायचीच डोक्यावर. असे म्हणतात कि एका पोराने त्याला विचारले होते म्हणे सर तुम्ही डोक्यावर सारखी टोपी का घालता तर मास्तराने तुझी आई नेहमी परकर का घालते असे विचारले होते म्हणे. तिसरी शिकवणी पण स्पेशल. इथे तर कधी कधी स्पेशल चहा पण मिळायचा. ह्या मास्तराने थोडंफार व्याकरण शिकवलं. पण इतकंही समाधान लाभले नाही.

या ३ शिकवण्यांच्या मदतीने १० वीचा बोर्डाचा इंग्लिशचा पेपर दिला कसा बसा. कधी नव्हे ते D आणि E अनुभाग पण सोडवले होते. बत्तुल मास्तरच्या २-३ दिवसांच्या शिकवणीचा खूपच फायदा झाला होता. पण एवढं सगळ करूनही नापास होतो कि काय असे वाटत होते. लिहिलेल्या उत्तरांची पडताळणी करण्यासाठी मी काही प्रश्नांची उत्तरे घरी येताना प्रश्नपत्रिकेवर लिहून आणली होती. उरलेल्यांची घरी आल्यावर प्रश्नपत्रिकेवर लिहिली. मग आमच्या मातोश्री ती प्रश्नपत्रिका घेऊन तिसऱ्या मास्तराच्या घरी गेल्या आणि त्यांना माझी उत्तरे दाखवली. मास्तराने सगळं काही चेक केलंz आणि म्हणाले कि ५० गुण मिळायला काही हरकत नाही. जेंव्हा निकाल लागला तेंव्हा पाहिले तर ५१ गुण मिळाले होते. लढ बाप्पू, वड गांजा ... !!!

पुढे इंजिनीरिंगच्या दुसऱ्या वर्षी PL / PLA असा एक विषय होता. त्या विषयाच्या पुस्तकामधील "Check if the record can be passed to next level." अशा आशयाच्या वाक्येने माझी दांडी उडवली होती. कसे तर माझ्या उभ्या १८ वर्षांच्या इंग्लिश कारकीर्दीमध्ये कुण्या माईच्या लालाने/लालीने (कुण्या मास्तरने / बाईने) प्रश्न "If / Check If" ने तयार करता येतात हे सांगितले नव्हते. तसेच वाक्याच्याशेवटी प्रश्नचिन्ह न लिहिता पण प्रश्न विचारला जाऊ शकतो हे मला त्यावेळी ठाऊक नव्हते. तर असले वाक्य आले कि मला त्या वाक्यामध्येच काही तरी लोचा आहे असे वाटायचे, काही तरी स्पेलिंगची चूक अथवा छपाईची चूक आहे असे वाटायचे. मी लिहिणाऱ्याच्या नावाने बोंबलायचो.बरं हे एवढ्यावर थांबायचे नाही तर माझा पुढे अभ्यास करण्याचा मूडच निघून जायचा. आहे का पंचाईत. तर हे असले फंडे वापरून वापरून कसे बसे पेपरमध्ये काही तरी इंग्लिश लिहून पास व्हावे लागायचे/लागले. बऱ्यापैकी येत असूनही सगळीकडे इंग्लिश लोचे करायचे.

इंजिनीरिंगच्या पहिल्यावर्षी आम्हाला "दाते" मास्तर होते. हे एकदम मितभाषी होते पण ह्याचे फंडे मात्र एकदम अजब. आकृत्यामधील (diagrams) मधील नावे हि CAPITAL LETTERs मध्येच हवी वगैरे वगैरे. मला ह्या मास्तराचे जरा जास्तीच कौतुक वाटायचे. कारण काय तर ह्याने स्वतःजवळची जी हजेरीची यादी आहे ती बारावीच्या गुणांनुसार तयार केली होती त्यामुळे माझे नाव या मास्तराच्या हजेरीपटावर दुसरे यायचे. इंजिनीरिंगमध्ये एवढेच काय ते समाधान. तर एकदा पहिल्या वर्षाच्या Mechanical चे submission चालू होते. माझा नंबर उशिराने आला. आणि मला नेमके त्यादिवशी सोलापूरला जायचे होते. मास्तरने प्रश्न विचारला तर मी तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये उत्तरे देत होतो - सगळ्या व्याकरणाचा बट्ट्याबोळ. मग मास्तरलाच माझी कीव आली आणि त्यानेच मला विचारले कि तुझ्या बोलण्यामध्ये regional tone जास्त येतोय आणि इंग्लिश बोलताना पण प्रोब्लेम येतोय. मग खल्लास आपण डायरेक्ट मराठीच सुरु केले. अहो राज ठाकरे आत्ता आत्ता मराठी मराठी बोंबलतोय पण मी इंजिनीरिंगपासूनच लढतोय हो. पण माझ्याकडे कुणी लक्षच देतनाही.

इंग्लिशबद्दलच्या काही गमती जमती / आठवणी -
- माझ्या एका HR Interview मधील संभाषण
मी - I leaved True Advantage in May 2007.
HR - leaved???
मी - I leaved True Advantage in May 2007.
HR - Leaved or Left???
मी - Sorry, left. I left True Advantage in May 2007.

- इंजिनीरिंग मध्ये मला एकाने "You was ..." लिहिले/म्हंटले तर चालते असे सांगितले होते. पण चाऊस यांच्या कृपेने हा योग कधी जुळून आला नाही आणि माझा पचाकाही झाला नाही. Thanks Chaus!!!

 - पेपरमधील एका मराठी लेखातील शेवटची ओळ पुढीलप्रमाणे होती - आणि हसून हसून ती मुलगी थोड्या वेळाने नॉर्मल / NORMAL झाली.
तर ह्या वाक्याचा आमच्या गावाकडील एका मुलीने पुढीलप्रमाणे अर्थ घेतला - आणि हसून हसून त्या मुलीची डिलिवरी नॉर्मल (DELIVERY NORMAL) झाली. तर ह्या बयेने NORMAL चा संबंध बाळंतपणाशी जोडून तिच्या दृष्टीने योग्य तो अर्थ काढला होता.

- C-DAC ला असताना मला rumour म्हणजे काय माहित नव्हते. मास्तर जे बोलतोय त्यावरून मी rumour चा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करीत होतो पण मास्तरचे बोलणे संपेपर्यंत मला rumour चा अर्थ कळलाच नाही.

- ९ वीत असताना इंग्रजीच्या पेपरमध्ये इंग्लिश चे मराठीत भाषांतर करा असा प्रश्न होता. इंग्लिश परिच्छेदात / paragraph माचीस असा शब्द होता. (बहुतेक तो परिच्छेद माचीस चित्रपटावर असावा. ठीकसे आठवत नाहीये). आमच्या वर्गातील एका पोट्ट्याने माचीस चा संबंध काडयापेटीशी जोडून भाषांतर केले होते. मला यातून "पास होण्यासाठी काय वाट्टेल ते ... " हा अर्थबोध झाला आणि मी इंजिनीरिंगच्या वेळेस काही वेळेला असेच काही प्रयोग केले.

- १२ वीला आम्हाला एक विचित्र मास्तर होता. तो पेपर पण खूपच विचित्र पद्धतीने तपासायचा. एकदा पेपरमध्ये ४ प्रश्नांची उत्तरे मी माझ्या शेजाराच्याची बघून जशीच्या तशी लिहिली होती. तर मास्तराने माझ्या शेजाराच्याची पहिली २ उत्तरे बरोबर दिली होती आणि माझी पुढची २. वर्गातील १००+ विद्यार्थ्यांपैकी फक्त ७ ते ८ जण पास.

- मध्ये मध्ये तर प्रत्येक वाक्यात HAVE घुसडण्याची सवय लागली होती. पण आता सर्व काही व्यवस्थित चालू आहे. सध्या इतरांच्या तुलनेत माझे इंग्लिश बरेच चांगले आहे हे जाणवते.

७ टिप्पण्या:

  1. English tar khupch vait hot be tuz..... aata pan ikato kadhi kadhi phone var bolatana... etake diwas lakshya navate dile pan aata dein...
    Lai Bhari re Amryaaa....
    Mast lihitoyas... chalu de

    उत्तर द्याहटवा
  2. काही प्रश्न
    अमर : (कदाचित चुकीच्या) ज्ञानावर असलं भलतसलतं तत्वज्ञान बरळायचो आणि भांडायचो.
    राम : बरळायचो आणि भांडायचो , हे गुण भुतकाळात कसे गेले, आपल्याला भेटुन जास्त दिवस पण झाले नाहीत, त्यात तु ऎवढा बदललास. हया... आपल्याला नाही पटल बाबा. त्याला तु लगोलग वर्तमानात आण पाहु.

    अमर: सध्या इतरांच्या तुलनेत माझे इंग्लिश बरेच चांगले आहे हे जाणवते.
    राम : याची अनुभुती आमच्या पासुन दुर गेल्या वर झालीच ना???

    BTW छान लिहिल आहेस. Don't misinterpret it hmmm :)

    उत्तर द्याहटवा
  3. काही प्रश्न
    अमर : (कदाचित चुकीच्या) ज्ञानावर असलं भलतसलतं तत्वज्ञान बरळायचो आणि भांडायचो.
    राम : बरळायचो आणि भांडायचो , हे गुण भुतकाळात कसे गेले, आपल्याला भेटुन जास्त दिवस पण झाले नाहीत, त्यात तु ऎवढा बदललास. हया... आपल्याला नाही पटल बाबा. त्याला तु लगोलग वर्तमानात आण पाहु.

    अमर: सध्या इतरांच्या तुलनेत माझे इंग्लिश बरेच चांगले आहे हे जाणवते.
    राम : याची अनुभुती आमच्या पासुन दुर गेल्या वरच कशी झाली?
    Don't misinterpret it hmmm :)
    BTW छान लिहिल आहेस.

    उत्तर द्याहटवा
  4. Thanks Satish!

    hi comment vachatana "Hilarious" mhanaje kay he mahit navhate mala. Mag dictionary madhe pahile ... :)

    उत्तर द्याहटवा