येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही हा लेख इंग्लिशमध्ये Disappointing Experience in my first Foreign Travel या ठिकाणी वाचू शकता.
जून २०११ पासून परदेशात जाऊन काम करण्याची संधी मिळणार याबाबत चर्चा चालू होती. पण कुठे जायचे आहे, कधी जायचे आहे याबद्दल कुणालाही काहीच माहिती नव्हती आणि शेवटी जूनच्या शेवटाला ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात त्या स्वीत्झर्लंडला जायचे आहे असे ठरले. पण कधी जायचे आहे हे काही ठरत नव्हते आणि व्यवस्थापक / मॅनेजर लोकांच्या नुसत्याच बड्याबड्या बाता असे काहीसे वातावरण निर्माण झाले होते.
आणि ही बातमी मी काम करतो त्या संस्थेतील / कंपनीतील माझ्या विभागामध्ये मी या संधीबद्दल कुणाशीही बोललेलो नसताना वाऱ्यासारखी फैलावली होती. बातमी इतकी फैलावली होती कि कुणाला कामकाजाबद्दलचे किंवा साधेसे इ-पत्र पाठवले तर त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये परदेशातील कामाबद्दलच्या संधीबद्दल विचारपूस - कधी जाणार आहेस?, कब जा राहे हो?, कब उड रहे हो?, तो ऑनसाइट /
onsite गेला वगैरे वगैरे ... कुणाशी बोलायला जावे तर या संधीबद्दल एखादे वाक्य ठरलेलेच. तसे पाहता ०१ ऑगस्ट २०११ पासून स्वीत्झर्लंडमधून काम सुरु करायचे ठरले होते पण जुलै उजाडला तरी गाडी / विमान काही पुढे ढकलले जात नव्हते. मग शेवटी अक्षरशः या संधीबद्दल विचारही सोडून मी आधीच ठरलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स / Valley of Flowers , गढवाल, उत्तराखंड, आग्रा सहलीला गेलो.
२३ ऑगस्ट २०११ ला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कडे जाणाऱ्या गढवाल / उत्तराखंड मधील श्रीनगर जवळच्या घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे आम्हाला घाटामध्येच उघड्यावर मुक्काम करावा लागला होता आणि त्याच वेळेला आमच्या विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक / मॅनेजरचा २ महिन्यांसाठी हैद्राबादमध्ये जोपर्यंत तुमचे विझा /
VISA चे काम होत नाही तोपर्यंत काम करावे लागणार आहे आणि जर आपण हैद्राबादमधून काम सुरु केले नाही तर आपल्याला मिळालेले काम (प्रोजेक्ट) आपल्या हातून जाणार आहे. या २ महिन्यांमध्ये तुम्ही कंपनीच्या खर्चाने तुमच्या खाजगी कामासाठी घरी जाऊ शकता वगैरे वगैरे ... तर तू तयार आहेस का? हे ऐकून झाल्यावर मी सांगितले की उद्या सकाळपर्यंत विचार करून सांगतो. मग भ्रमणध्वनी / Mobile वरून यासंदर्भातील इ-पत्र वाचलं आणि खरचं प्रोजेक्ट हातातून जाण्याची शक्यता होती म्हणून हैद्राबादमधून २ महिन्यांसाठी काम करण्याचे मान्य केले.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या सहलीवरून आल्याआल्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ०४ सप्टेबर २०११ ला हैद्राबादमध्ये कामासाठी रुजू झालो. हैद्राबादमध्ये पोहचलो रे पोहचलो तर विझा / VISA मंजूर झाल्याचे इ-पत्र आलेले. मग आमच्या व्यवस्थापकीय मंडळींना विझा / VISA आलेला आहे, परत पुणे कधी? याबद्दल विचारले तर साले एकही जण उत्तर द्यायला तयार नाही, परदेशगमन कधी याबद्दलही काही वाच्यता नाही. मी आणि माझा सहकारी संजू बाबा ने पण केला होता की ३१ ऑक्टोबर २०११ नंतर एकही दिवस हैद्राबादमध्ये राहायचे नाही म्हणून ... दिढ महिना काम झाल्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यामध्ये परदेशगमनाबद्दल इ-पत्रांवर इ-पत्रे पाठविल्यानंतर परदेशगमनाची पानं हलायला लागली आणि ३० ऑक्टोबर २०११ ला मुंबईवरून स्वीत्झर्लंडला निघायचे आहे असे ठरले.
मग दिवाळीच्या दरम्यान घरच्यांनाच दिवाळीसाठी पुण्याला बोलावून घेतले. त्याच दरम्यान आमचे सोलापूरचे मित्र विवेक बुधतराव आणि माझे जुन्या संस्थेतील / कंपनीतील व्यवस्थापक /
मॅनेजर रविंद्र फुलमामडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली थंडीचे कपडे खरेदी करून बॅगा भरून घरच्यांचा निरोप घेऊन मी ३० ऑक्टोबरला पुढील प्रवासासाठी के.के.ट्रॅव्हल्स च्या गाडीतून पुण्यातून मुंबईला प्रस्थान केले.
लुफ्थान्झा विमानामध्ये २३ किलोची एक चेक-इन बॅग आणि ८ ते १० किलोची एक केबिन बॅग नेण्याची परवानगी होती. पण माझ्या बॅगांचे वजन अनुक्रमे २३.५ आणि १४ किलो झाले होते त्यामुळे विमानतळावर सामान फेकून तर द्यावे लागणार नाही ना याची चिंता लागून राहिली होती. पण तसे काही झाले नाही.
मी साधारण रात्रीच्या ०८:४५ ते ०९:०० च्या दरम्यान विमानतळावर पोहचलो आणि संजू बाबाची वाट पहात बसलो. के.के. ट्रॅव्हल्स मधील सहकारी लविन गोपवाणी ने माझ्या भ्रमणध्वनीवरून त्याच्या आईला फोन करून सुखरूपपणे मुंबई विमानतळावर पोहोचल्याचे सांगितले आणि आम्ही आमच्या जोडीदारांची वाट पहात बसलो.
थोड्या वेळाने संजू बाबा आणि तो आत येत असतानाच मागून माझे जुन्या कंपनीतील व्यवस्थापक / मॅनेजर साहेब. मग तिघांनी मिळून बॅगा चेक-इन करून घेतल्या, सिक्युरिटी चेक-इन करून टर्मिनल २ वर विमानाची वाट पाहत बसलो. त्याआगोदर लविनचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्याच्या आईला काळजी लागली होती त्यामुळे काकूंनी मला फोन करून तो कुठेय, पोहचलाय ना व्यवस्थित, आज तो असा का करतोय, त्याचा फोन लागत नाहीये, त्याला मला फोन करायला सांग, मला खूप काळजी वाटतेय त्याची वगैरे वगैरे ... खूप भावनिक होऊन म्हणत होत्या त्या (आईची माया, काळजी ... पोरगं कितीही मोठं झालं तरी तिच्यासाठी ते छोटं बाळच ठरत ...). मग इमिग्रेशन / Immigration च्या आगोदर लविनला त्याचा फोन लागत नव्हता म्हणून SMS करून घरी फोन करण्याबद्दल सांगितले आणि सिक्युरिटी चेक-इन करून घेतलं. गोपवाणी काकू खूपच काळजी करीत होत्या म्हणून सिक्युरिटी चेक-इन झाल्यानंतर गोपवाणी काकूंना फोन करून लविनशी संपर्क झाला का म्हणून विचारून घेतले. बोलताना त्यांनी Thank you so much for your help and GOD bless you! असा आशीर्वाद दिला.
रात्री १२:४५ वाजता आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि आपापल्या विमानांकडे निघालो. विमान हे भलं मोठं - ३ रंग होत्या | २ | | ४ | | २ | च्या ... आतापर्यंत भारतातल्या भारतात विमानाने प्रवास झाला होता त्यामुळे एवढे मोठे विमान आतून पाहणे झाले नव्हते. ती हि हौस फेडून झाली यावेळी. विमानामध्ये तरुण आणि वयोवृद्ध हवाई सुंदरी होत्या तसेच विमानातली व्यवस्था देखील अगदी पद्धतशीर - आपण किती उंचीवर आहोत, अजून किती वेळ प्रवास राहिला आहे, विमान कोणत्या मार्गाने जात आहे वगैरे वगैरेची माहिती, सीटच्या समोर छोटासा टीव्ही असं सगळं काही व्यवस्थित होतं. भारतीय वेळ ऑक्टोबर महिन्यापर्यंत जर्मनी आणि स्वीत्झर्लंडच्या वेळेच्या ०३:३० पुढे आहे. पण विमानामध्ये मी जेंव्हा म्युनिकला पोहचण्यासाठी उरलेल्या वेळेची भारतीय वेळेत बेरीज-वजाबाकी करीत होतो तेंव्हा ०४:३० तासांचा फरक येत होता आणि काही तरी लोचा आहे किंवा काही तरी लोचा होत आहे असे वाटत होते.
माझ्या शेजारी स्वीत्झर्लंडमधील झ्युरिक शहरातील एक प्रेमी युगुल बसलं होतं. म्युनिकला पोहचायला २० मिनिटे राहिली असताना मी त्या जोडीशी म्युनिकमधील हवामानाबद्दलची विचारपूस करण्यासाठी म्हणून बोलायला सुरुवात केली जेणेकरून विमानातून बाहेर पडताना किती गरम कपडे घालावे लागतील याची कल्पना येईल म्हणून. मग त्यांच्याकडून बऱ्यापैकी माहिती मिळाली. हे जोडपं नुकतचं भारतभ्रमंती करून आलं होतं आणि त्यांना भारत आवडला देखील होता. मग २० मिनिटे आम्ही छान गप्पा मारल्या - ते म्हणत होते की स्वीत्झर्लंडची लोकसंख्या ६० लाख आणि एकट्या मुंबईची लोकसंख्या ६ कोटी, खूप वेगळं वाटत होतं, राजस्थान, दिल्ली मधील पर्यटन स्थळे वगैरे वगैरे ... मी ही माझे गाव सोलापूर, मुंबईपासून एवढ्या एवढ्या अंतरावर आहे, इथे अशी अशी ठिकाणे आहेत वगैरे वगैरे माहिती सांगितली.
माझ्या नेहमीच्या प्रत्येक भाषेतील २ - ४ शब्द शिकून घेण्याच्या सवयीप्रमाणे त्यांच्याकडून जर्मन भाषेतील २ - ४ शब्द शिकून घेतले.
English
|
German
|
Respectful Hello
|
Grüezi (Used in Switzerland and border of German)
|
Good Morning
|
Guten Morgen
|
Thank you
|
Danke
|
त्यांच्याशी बोलताना मस्त वाटले आणि नंतर असे जाणवले की जरा लवकर बोलायला सुरुवात करायला हवी होती म्हणजे आणखी मजा आली असती. तो मुलगा स्वीत्झर्लंडमधील चित्रपट निर्माता होता आणि आतापर्यंत त्याने १७ - २० लघुचित्रपटांची निर्मिती केली होती. मग आम्ही एकमेकांचे इ-संपर्क दिले आणि साधारण ०७:०० वाजता आम्ही म्युनिकला पोहचलो. तुम्ही झ्युरिकला येण्याआगोदर आम्हाला इ-पत्र पाठवा मग आपण मिळून फिरुयात असे म्हणून त्यांनी आमचा निरोप घेतला.
३० ऑक्टोबरला युरोपमध्ये दिवसाचा जास्ती वेळ कामासाठी मिळावा म्हणून (Day Light Saving) घड्याळे एका तासाने मागे घेतली जातात पण म्युनिक विमानतळावर घड्याळ एका तासाने मागे घेतलेले नव्हते. त्यामुळे आम्हाला विमानतळावर पोहचूनही १० मिनिटे विमानतळावरच बसावे लागले. (उशीर होण्याचे विमानातील कर्मचाऱ्यांनी सांगितलेले कारण. तुम्हाला कदाचित याचे आश्चर्य वाटेल पण आहे ते आहे.). म्युनिकवरून स्वीत्झर्लंडला (बासेल / Basel शहर) २ तासाने विमान असल्याने आम्ही सिक्युरिटी चेक-इन करून विमानाची वाट पाहत बसलो.
संजू बाबाने Airtel ला रेंज येते का, Airtel चे सिमकार्ड चालते का, आणि किती रक्कम बाकी आहे पाहण्यासाठी म्हणून २ SMS करून पाहिले तर रु. ५० ला बांबू. १ SMS - रु. २५. विमानतळावरून घरी फोन करण्याचे काही आम्हाला जमले नाही म्हणून घरी SMS करून कळवले आणि २ तासाने स्वीत्झर्लंडकडे प्रस्थान केले. प्रवासामध्ये शिकलेल्या जर्मन शब्दांचा वापर करीत आणि समोरच्यांचे स्मितहास्य पाहत पाहत प्रवासास सुरुवात केली. स्वीत्झर्लंडला (बासेल / Basel) जाणारे हे विमान अगदी मोकळे होते - बोटांवर मोजण्याइतके लोक. बासेलला पोहोचेपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू होतं आणि भरपूर उस्ताह होता. पण बासेलच्या विमानतळावर पोहचल्या पोहचल्या आतापर्यंतच्या सुखरूप आणि उस्ताही प्रवासाला नजर लागावी त्याप्रमाणे किंवा त्यावर काळा डाग पडावा या पद्धतीने लोचे सुरु झाले.
बासेलच्या मस्त थंडीमध्ये विमानातून प्रचंड उस्ताहामध्ये खाली उतरत असताना आणि तिथून विमानतळाकडे जात असताना माझे लक्ष्य जिथे विमानातून प्रवाशांचे सामान बाहेर काढले जात होते तिकडे गेले. तेंव्हादेखील तोच उस्ताह होता पण नेमके जेंव्हा माझे लक्ष्य विमानातून एक काळी "American Tourister" कंपनीची चैन तुटलेली बॅग काढून प्रवाशी सामानाच्या गाडीमध्ये ठेवली जात होती तिकडे गेले तेंव्हा मात्र माझ्या मनात "च्याआयला, ही बॅग माझी तर नाही न?" पाल चुकचुकून गेली. "असोत, ती बॅग माझी नसेल / नसावी " असे म्हणून विमानतळाकडे निघालो. संजू बाबाने विमानामध्ये एका जर्मन नागरिकाकडून आम्हाला जायच्या पत्त्याबद्दल बऱ्यापैकी माहिती काढली होती आणि त्या नागरिकाने त्याच्या मोबाईलवरून आवश्यक त्या व्यक्तींना फोन करण्यास स्वतःहून परवानगी दिली होती. पण योगायोगाने विमानतळाकडे जाताना आम्हाला इन्फोसिस / Infosys मधील एकाने त्याच्या मोबाईलवरून आम्हाला आवश्यक त्या व्यक्तींना फोन लावून दिला पण रविवार असल्याने स्वीत्झर्लंडमधील व्यावसायिक पद्धती / संस्कृती प्रमाणे सगळ्यांनी त्यांचा मोबाईल वॉइस मेल / Voice Mail वर ठेवला होता ... हाय रे पंचाईत. २ -३ वेळा फोनचा प्रयत्न झाल्यावर सामान घेण्याच्या जागी गेलो आणि ती चैन तुटलेली अर्धवट उघडी बॅग पुन्हा मला दिसली आणि उघडून पाहतो तर ती बॅग माझीच होती. कालच विकत घेतलेल्या बॅगची अशी अवस्था ... मग तिला प्रेमाने बाहेर घेतले आणि सामानाची पडताळणी करण्यास सुरुवात केली.
बॅगच्या चैनची झिप मध्येच आणून सोडली होती आणि बॅग अर्धवट म्हणण्यापेक्षा उघडीच होती असे म्हंटलं तर वावगे ठरणार नाही. सामान उघडून पाहतो तर तांदळाची पिशवी फाटलेली, अर्धे तांदूळ गायब, डिओचे टोपण तुटलेले, रव्याची पिशवी फाटलेली, सामान अस्ताव्यस्त ... हे बॅगचे असे अस्ताव्यस्त सौंदर्य पाहून झाल्यावर चैन दुरुस्त होते का ते पाहिले, चैन कशीबशी बसली आणि थोडेसे हायसे वाटले. हे सगळं पाहून मी जरा नाराजच झालो. जर संशय आलाच असेल तर सामान तपासणे - अगदी मान्य, सामान ठेवताना थोडेफार अस्ताव्यस्त होणे - हे ही अगदी मान्य. पण किमानपक्षी बॅगची चैन आणि बॅग बाह्यरुपी तरी व्यवस्थित मिळावी अशी माझी अपेक्षा होती / आहे. तसे पाहता विमानतळावर चेक-इन बॅगची दृष्टी परिक्षा / scanning होतच असेल आणि तरीसुद्धा असे?
"असोत ... झाले गेले होऊन गेले" असे म्हणून मी नाराजी लपविण्याचा प्रयत्न करीत होतो आणि झाल्या प्रकाराबद्दल कसल्याही परिस्थितीत विमानतळावर जाब विचारायचाच हा विचार माझ्या मनात घोळत होता. आणि या सगळ्यात आणखी भर म्हणून की काय आवश्यक त्या व्यक्तींशी संपर्क होत नव्हता. मग पुन्हा एकदा इन्फोसिस च्या व्यक्तीकडून फोन लावण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा तोच अनुभव. शेवटी त्याला आवश्यक त्या व्यक्तीला SMS करायला सांगितले आणि त्यांचा निरोप घेतला. लुफ्थान्झाचे ऑफिस कुठे आहे, बाहेर कुठून पडायचे याची विचारपूस करायला लागलो तर सगळेच जर्मन बोलणारे. मग कसेबसे बाहेर कसे पडायचे याचा अंदाज बांधून आम्ही सिक्युरिटी-चेक च्या परिसरातून बाहेर पडलो. बाहेर गेल्यावर चौकशी केंद्रामध्ये चौकशी करून घेतली - फोन बुथ कुठे आहे, विमानतळावर नवीन SIM मिळते का, SIM चे दुकान कुठे आहे, लुफ्थान्झाचे ऑफिस कुठे आहे वगैरे वगैरे ... या सर्व प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरे मिळाल्यावर मग घरच्यांना सुखरूप पोहोचल्याचे सांगण्यासाठी म्हणून फोन करण्याचा प्रयत्न केला तर ते काही जमेना. त्या फोन मशीनमध्ये फक्त क्रेडीटकार्डच चालत होते आणि मी HDFC च्या प्रीपेड कार्डने प्रयत्न करीत होतो. मी घरच्यांना बासेलला पोहचण्याची वेळ ०३:३० तासांच्या फरकाने सांगितली होती पण आजपासून ०४:३० तासांचा फरक झाला होता आणि विमानतळावर अर्धा तास झाला होता त्यामुळे घरचे अतीव काळजी करीत असतील म्हणून मला कसल्याही परिस्थितीत घरी सुखरूपपणे पोहोचल्याचे कळवायचे होते आणि त्यासाठी माझी धडपड चालू होती. पुन्हा प्रयत्न केला पण पुन्हा अपयशी. ही धडपड चालू असताना बासेलवरून इंग्लंडला निघालेल्या श्रीलंकन पोराने आम्हाला मदत केली आणि आम्हाला आवश्यक त्या व्यक्तीला फोन लावून दिला. योगायोगे यावेळी आमचा फोन लागला. आम्ही बासेलमध्ये पोहोचल्याचे सांगून आम्हाला मिळालेल्या घराच्या चावीची सोय करण्यास सांगून आम्ही पुढील कामास सुरुवात केली. हा संपर्क झाल्याने थोडेसे हायसे वाटले. पण या सर्व गडबड गोंधळात मी स्वीत्झर्लंडमधील आवश्यक त्या व्यक्तींची संपर्क माहिती असणारा कागद आणि एक चांगला पेन फोनबुथवरच विसरलो.
आता संपर्क साधून झालाच आहे तर बॅगच्या अवस्थेबद्दलचा जाब विचारण्यासाठी माझी धडपड सुरु झाली. पुन्हा चौकशी केंद्रावर जाऊन चौकशी केली तर तिथे असलेल्या फोनवरून तुम्ही फोन लावा असे सांगण्यात आले. फोन लावून झाल्या प्रकाराबद्दल सांगितल्यावर त्यांनी मला ऑफिसमध्ये येण्यास सांगितले. पण ऑफिसमध्ये कुठून आणि कसे जायचे हे काही मला कळले नाही आणि बोलतानाही जर्मन-इंग्लिशचा लोचा. मग शेजारच्या कॅफेमध्ये विचारले तर पुन्हा जर्मन-इंग्लिश लोचा, पुन्हा चौकशी केंद्र, पुन्हा फोन वगैरे वगैरे ... पुन्हा फोन करून आम्ही कसेबसे ऑफिसमध्ये पोहचलो. तिथे जाऊन झाल्या प्रकाराबद्दल सांगितले तर - जर सामान खराब झाले असेल तर आम्ही तक्रार नोंदवू शकतो पण सामान गायब झाले असेल, बॅग खराब झाली असेल तर पोलिसांकडे तक्रार करावी लागेल आणि तुम्हाला तक्रार करायची असेल तर पोलिसचौकी इथे इथे आहे. तुम्ही झाल्या प्रकाराबद्दल लुफ्थान्झाकडे या या संपर्कावर इ-पत्र पाठवू शकता. आता नवीन ठिकाणी पहिल्याच दिवशी पोलीस तक्रार आणि परत नवीन आफत ओढवून घेण्यापेक्षा इ-पत्र पाठवून काय होते का ते पाहूयात असे ठरवून धन्यवाद / Danke / Thank You म्हणून आम्ही तेथून निघालो.
विमानतळावर उतरल्यापासून सगळीकडे सामसूम होती. त्यात आज रविवार म्हणून विमानतळावरील दुकानेदेखील बंद होती. ही सर्व नाराजी पत्करून विमानतळावरून बाहेर पडून पाहतोय तर टॅक्सी होत्या खऱ्या पण सगळे ड्रायव्हर गायब. हाय रे देवा! मग पुन्हा आम्ही विमानतळाकडे जाऊन एका धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीस विचारले तर हे महाशयच टॅक्सी ड्रायव्हर होते. त्याच्याशी बोलताना पुन्हा जर्मन - इंग्लिश लोचा. त्याला पत्ता दाखवला आणि सोड बाबा इथे म्हंटलं. काही वेळातच ५ -७ कि.मी. अंतरावर असलेल्या सांगितलेल्या जागी आम्ही पोहचलो. ज्या रत्याने आम्ही जातोय तो रस्ता पहिला तर - है साला, सामसूम, रस्त्यावर कुत्रदेखील नाही. च्यामारी, भारतामध्ये एखादा संप / कर्फ्यू / Curfew असेल, राजीव गांधी मेला होता तेंव्हा, किंवा मयत झालेल्या घराजवळ सुद्धा एवढी सामसूम नसेल असे जाणवले.
सांगितलेल्या पत्त्यावर पोहचल्यावर घराचे आणि घरभाडयाचे काम करणारी प्रतिनिधी / एजंट / Agent तिथे हजर होती. आम्ही पोहचल्या पोहचल्या - "Sorry, I thought you will come by …" वगैरे वगैरे ... मग सगळं सामान घेऊन घरामध्ये गेल्यावर तिने घराबद्दल माहिती दिली - हे असे आहे, हे तसे आहे, हे असे असते, हे तसे असते वगैरे वगैरे ... ह्या बयेच २ - ३ वाक्ये झाली कि हसणं चालू असायचं तसेच प्रत्येक गोष्टीत घाई घाई घाई. एखादी वस्तू दाखवताना ती तुटेल, खराब होईल याचा विचार न करता निष्काळजीपणे इकडे तिकडे हलवणे आणि वरून हसणे. हसण्याबद्दल विशेष वाटलं मला. हसत राहणं आवडलं मला.
घरातील मायाजाल / Internet चालू होत नव्हते. हे मायाजाल म्हणजे जणू काही आम्हाला शापच आहे कि काय असे वाटले. हैद्राबादमध्येदेखील अशीच बोंब होती. मग पुन्हा धडपड करून मायाजाल चालू केले. सगळी माहिती घेऊन झाल्यावर हातपाय धुऊन घेतले आणि मायाजालावरून घरी सुखरूप पोहोचल्याचा SMS पाठवला. घरी निरोप देण्यासाठी मायाजालावर बोलण्यासाठी कुणी भेटते का ते पाहिले तर योगायोगे एक मैत्रीण भेटली. तिच्याकरवे मी स्वीत्झर्लंडला सुखरूप पोहोचल्याचा आणि आईवडिलांच्या पासपोर्टचे काम व्यवस्थित पार पाडण्याबद्दलचा घरी निरोप दिला. घरी एकदाचा निरोप पोहचल्यानंतर मला हायसे वाटले आणि समाधान वाटले.
मग पोटाला थोडासा नैवेद्य दाखवून आम्ही नवीन SIM घेण्यासाठी म्हणून मुख्य रेल्वेस्थानकावर गेलो. रेल्वेस्थानकावरून SIM, पोटपुजेसाठी आवश्यक त्या भाज्या, आणि खाद्यपदार्थ घेऊन आम्ही परत घरी आलो. मग घरच्यांना फोन करून (सकाळपासूनच्या खेददायक अनुभवाबद्दल सांगून चिंता वाढवण्याचे टाळण्यासाठी त्याबद्दल 'भ्र' ही न बोलता) सुखरूप पोहोचल्याचे सांगितले. आणि शेवटी आनंद भाटे याने गायलेल्या बालगंधर्व यांचे वद जाऊ कुणाला शरण ... हे पद ४ - ५ वेळा ऐकून दिवसभराचा सगळा शीण घालवून दिवसाची उस्ताहपूर्वक सांगता केली.
काही दिवसांपूर्वी हाती आलेल्या बातमीनुसार आम्हाला परदेशी पगार तसेच भारतीय पगार असे दोन्ही पगार मिळणार असल्याची अफवा आमच्या विभागामध्ये / Department मध्ये पसरल्याचे कळाले. पण आम्हाला फक्त परदेशी पगारच मिळणार आहे. काय बोलावे याबद्दल - :)
आमच्या पक्षकार / Client बरोबर नुकत्याच झालेल्या संभाषणानुसार कंपनीच्या अंदाजपत्रकानुसार आम्हाला एका महिन्याने भारतामध्ये परत पाठविले जाणार आहे. आणि याबद्दलचा निर्णय येत्या ३ आठवड्यांमध्ये घेतला जाणार आहे.
- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ४ १ ७ ६ ५ १ ० ६ ८ ३ ४)
मंगळवार, २९/११/२०११
मग पोटाला थोडासा नैवेद्य दाखवून आम्ही नवीन SIM घेण्यासाठी म्हणून मुख्य रेल्वेस्थानकावर गेलो. रेल्वेस्थानकावरून SIM, पोटपुजेसाठी आवश्यक त्या भाज्या, आणि खाद्यपदार्थ घेऊन आम्ही परत घरी आलो. मग घरच्यांना फोन करून (सकाळपासूनच्या खेददायक अनुभवाबद्दल सांगून चिंता वाढवण्याचे टाळण्यासाठी त्याबद्दल 'भ्र' ही न बोलता) सुखरूप पोहोचल्याचे सांगितले. आणि शेवटी आनंद भाटे याने गायलेल्या बालगंधर्व यांचे वद जाऊ कुणाला शरण ... हे पद ४ - ५ वेळा ऐकून दिवसभराचा सगळा शीण घालवून दिवसाची उस्ताहपूर्वक सांगता केली.
काही दिवसांपूर्वी हाती आलेल्या बातमीनुसार आम्हाला परदेशी पगार तसेच भारतीय पगार असे दोन्ही पगार मिळणार असल्याची अफवा आमच्या विभागामध्ये / Department मध्ये पसरल्याचे कळाले. पण आम्हाला फक्त परदेशी पगारच मिळणार आहे. काय बोलावे याबद्दल - :)
आमच्या पक्षकार / Client बरोबर नुकत्याच झालेल्या संभाषणानुसार कंपनीच्या अंदाजपत्रकानुसार आम्हाला एका महिन्याने भारतामध्ये परत पाठविले जाणार आहे. आणि याबद्दलचा निर्णय येत्या ३ आठवड्यांमध्ये घेतला जाणार आहे.
टीप: लेखनाचा बाज कायम ठेवण्यासाठी (वाढवण्यासाठी) वरील टिपणामध्ये घराचे आणि घरभाडयाचे काम करणाऱ्या प्रतिनिधी / एजंट / Agent चा एके ठिकाणी 'बये' असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच व्यवस्थापकीय / मॅनेजर मंडळींना 'साले' असे संबोधण्यात आले आहे.
- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) (+ ४ १ ७ ६ ५ १ ० ६ ८ ३ ४)
मंगळवार, २९/११/२०११
dhanya... :(
उत्तर द्याहटवा~gaurav