मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

!!! श्रीगणेशा !!!

खूप दिवसांपासूनची इच्छा होती की आपण सुद्धा ब्लॉग लिहावा पण आळशीपणामुळे हा विचार मी "उद्या" वर ढकलायचो. अखेरीस तो "उद्या" आज उगवला.

"मराठी" भाषेवरील प्रेमामुळे मी माझे लेखन मराठी भाषेमध्ये करणार आहे. तसेच "इंग्रजी" वाचकांनाही मी माझ्या लेखनामध्ये काय प्रताप गाजवतोय हे कळावे म्हणून प्रत्येक लेख इंग्रजीमध्येदेखील खरडणार आहे (अर्थात यामागील खरा हेतू हा आहे की माझे इंग्रजी सुधारावे). बघुयात काय होते ते (Let see what happens )?

आता जरी मी म्हणत असलो की लेखन मराठीतच करणार आहे पण या लेखांमध्ये मार्लीश (मराठी + इंग्लिश/इंग्रजी) शब्दांचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. एखादे उदाहरणच द्यायचे झाले तर "मी माझ्या कंपनीतील टीमबरोबर ट्रीपला गेलो होतो => मी माझ्या संस्थेतील संघ/समूह बरोबर सहलीला गेलो होतो.". सध्याच्या आपल्या व्यवसायामुळे अथवा बोलण्याच्या पद्धतीमुळे पहिले वाक्य "मी माझ्या कंपनीतील टीमबरोबर ट्रीपला गेलो होतो" च समजायला सोपे जाते (किमानपक्षी मला तरी). 

असेच काही मार्लीश शब्द -
"Team / Group = संघ/समूह", "Resource / Employee = कामगार", "Trip = सहल", "Company = संस्था".

प्रामाणिकपणे सांगायचे तर मला या गोष्टीची चिंता वाटते की येत्या काही वर्षांमध्ये काही मराठी शब्द मराठी शब्दकोशातून निघून तरी जाणार नाही ना ... याची आपणच काळजी घेतली पाहिजे ...

पहिलाच लेख/टिपण आहे त्यामुळे चूकभूल देणे घेणे ...

धन्यवाद!!!

३ टिप्पण्या:

  1. गायकवाड हे काय अचानक ! पण मस्त आहे. असच चालू ठेव.
    याच्यासाठी काही सेन्सोर बोर्ड वैगेरे नसतो का ?
    Anyways carry on

    उत्तर द्याहटवा
  2. lai... laiii .. bhhaarrii...Rao.. evadha vel bhetato ka re....kuthache chhaaple.. ... pan chalu det...

    उत्तर द्याहटवा