बुधवार, २० एप्रिल, २०११

सिक्कीम प्रवास वर्णन - दिवस पहिला


दिनांक: ३१/१०/२०१० - रविवार

मी, विवेक, समीर, आणि श्रीकांत

गुर्ं गुर्ं $$ ... गुर्ं गुर्ं $$ ... मध्यरात्रीची ०४:४५ ची वेळ ... मोबाईलच्या गजरचा आवाज – टी टी ट् ... टी टी ट्


मला १० मिनिटांनी उठव. एकाने पाणी तापवायला घेतले. एकानं चहाची जबाबदारी ... अशा प्रकारे आम्ही (मी, समीर, विवेक, आणि श्रीकांत) सकाळची आन्हिकं उरकायला सुरुवात केली. उठल्या उठल्या बाकीचे उठले का म्हणून इतरांना फोनाफोनी करण्यात आली. सुमितला फोन केला तर तो काही फोन उचलायला तयार नाही म्हणून आमच्या दिपकरावांना फोन केला. दिपकराव एवढ्या भल्या पहाटे सुद्धा एकदम चार्ज होते- चार्ज कुठले तर फुलटू चार्ज होते.



दिपक हँलो.
अमर हँलो, सुमित उठला का?
दिपक: होय. YES. एकदम READY. READY.
अमर: OK.


आमच्या आवराआवरीला सुरुवात झाली न झाली तोवर प्रशांतसाहेबांचा फोन आला की, त्याचे गाडी चालविण्याचे अनुद्यप्ती/परवाना पत्रक सापडत नाहीये, चुकून तुमच्याकडे आले आहे का वगैरे वगैरे. शेवटी साहेबांना कोथरूडवरून फुरसुंगीला जाऊन अनुद्यप्ती/परवाना पत्रक आणावे लागले. वेळ आणि दगदग वाचावी म्हणून विमानतळाच्या जवळील मित्रांच्या घरी राहण्याचे ठरले होते पण ... :) ... प्रशांतनेच सर्वांना सांगितले होते की २ फोटो, ओळखपत्र, गरम कपडे जवळ घ्या वगैरे वगैरे आणि तोच ओळखपत्र विसरून आला. पशाभाई, झिंदाबाद! || ऐसी छोटी मोटी चीजे होती रहती है ||


मग आमचं सगळं आवरून आम्ही श्रीकांतरावांच्या Swift Dezire मधून चंदननगरवरून विमानतळाकडे निघालो. पण विमानतळाकडे जाणारा जवळचा रस्ता कुणालाच माहित/आठवत नव्हता त्यामुळे रिस्क/RISK नही मांगता म्हणून आम्ही माहिती असलेल्या जरा लांबच्या रस्त्याने विमानतळावर पोहचलो. आणि या दरम्यान छोटेसरकारांचं नेहमीप्रमाणे चिडचिडेपणाचे तुला गाडी येत नाही वगैरे वगैरे मनोरंजन चालू होते. विमानतळावर प्रवेश करताना इथून नाही, तिथून नाही, इकडून, तिकडून असे म्हणत म्हणत आम्ही EXIT GATE मधून आत प्रवेश केला आणि आमची गाडी NO PARKING मध्ये लावली गेली. काही वेळानंतर पाटस ग्रहावरील आव्हाडांची गाडी आली. उतरल्या उतरल्या – हे पेशु, ओळखपत्र आणलेस का? पण सुमितचा अजून काही पत्ता नव्हता. त्याला विमानप्रवासाचा भरपूर अनुभव असल्याने काळजी करण्याचे कारण नव्हते पण तरीही हुरहूर लागूनच राहिली होती. वेळ होताच तर मग एखादं दुसरा फोटो काढून घेण्याचे ठरले आणि एक-दोन फोटो काढून घेतले.


संदीप, प्रशांत, समीर, सचिन, आव्हाड काका, डॉ. गणेश आव्हाड, अमर, विवेक

श्रीकांत, प्रशांत, समीर, सचिन, आव्हाड काका, डॉ. गणेश आव्हाड, अमर, विवेक

पण एवढ्यात विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी NO PARKING मध्ये गाडी लावल्याने गाडीला जामर/JAMMER लावले. ढ़ँट् ढँण ... ढ़ँट् ढँण ... मग त्या कर्मचाऱ्यांशी बोलणी करून पैसे देऊन गाडी सोडवून घेतली.


NO PARKING चा प्रकार संपवून आम्ही विमानतळावर चेक-इन/CHECK IN  करण्यासाठी निघालो. विमानतळाच्या गेटजवळ पोहचतो न पोहचतो तोपर्यंत दिपकराव आणि सुमित आले. सुमित त्याच्या भल्या मोठ्या बॅगेमध्ये थोड्थोडके सामान घेऊन आला होता.


मग चेक-इन प्रक्रिया/PROCESS ला सुरुवात झाली. हे लेबल लावा, इकडे जावा, तिकडून जावा, तुम्ही किती जण आहात, तुमचे सामान कोणते? असे आदेश आणि प्रश्न-उत्तरे यांचा खेळ खेळत आम्ही विमानाकडे प्रस्थान केले. इथे एक महत्वाची बाब समजून आली ती म्हणजे तुमचे सामान तुमच्या समूहा/ग्रुप बरोबर मोजले जाऊ शकते त्यामुळे जरी तुमच्याकडे प्रमाणापेक्षा जास्ती सामान असले तरी काळजी करायची गरज नाही. विमानतळावर कुणाला तरी हुडकून डाव साधून घेता येऊ शकतो.


विमानाकडे जाताजाता विमानतळाची स्वच्छतागृहे कशी आहेत आणि प्रवासामध्ये गडबड होऊ नये म्हणून लघुशंका उरकण्यासाठी स्वच्छतागृह गाठले आणि पुन:प्रत्यय आला कि ह्ये आपलं पुणेच हाय! विमानात प्रवेश करताना वाटले होते कि चित्रपटांमध्ये दाखवतात अगदी तशाच ३६-२४-३६ वाल्या हवाई सुंदरी पहायला मिळतील पण इथेही घोर निराशाच झाली. अहो ३६-२४-३६ मध्ये +४ वाल्यादेखील नव्हत्या हो त्या, त्याहून जास्तीवाल्याच भासल्या त्या ... इतकचं पुरेसं, जास्ती लिहीत नाही.


मग आत गेल्यावर आम्ही आगोदर ठरवल्याप्रमाणे खिडक्यांजवळच्या  जागांवर बसलो. जागेवर बसल्यानंतर हवाई सुंदरींनी दिलेल्या माहितीनुसार बसून/वागून काही वेळानंतर आमच्या विमानाने हवेत उड्डाण केले. आणि आमच्या प्रवासास सुरुवात झाली.विमानाचे उड्डाण होताना सगळ्यांना थोडेसे भीती वाटल्यासारखे झाले. या प्रवासामध्ये आगगाडी/रेल्वे प्रवासासारखी मोकळीक नाही जाणवून आली. एका जागी स्तब्ध बसणे, जास्ती मनोरंजन नाही, समोर जितकी हिरवळ दिसेल त्यातच समाधान मानणे, त्यात हवाई सुंदरी अशा ... संपूर्ण प्रवासभर विमानाच्या इंजिनाचा आवाज ... अशा प्रकारांमुळे आमच्यापैकी बहुतेक जणांना पहिला विमानप्रवास इतका भावला नाही/आवडला नाही. चित्रपटामध्ये पूर्वार्ध संपल्यानंतर जसा मध्यंतर होतो ना त्या पद्धतीने आम्ही आमच्या विमान प्रवासाचा पूर्वार्ध संपवून मध्यंतरासाठी म्हणून दिल्लीला पोहचलो.


दिल्ली विमानतळावर साधारण ०२-०२:३० तास दुसऱ्या विमानासाठी थांबायचे होते म्हणून सकाळच्या न्याहरीसाठी आम्ही दिल्ली विमानतळावरील पदार्थांचे भाव पाहतो तर काय? – कमीत कमी किंमत रु. ६०, रु. ८९ + सेवा कर ... या किमती पाहून आमच्या रक्तातील मध्यमवर्गीयपणाचा गुण उफाळून आला आणि म्हणून विमानतळाबाहेरील एका हॉटेलमध्ये गेलो आणि तिथला भाव काय तर – डोसा: रु. १२५, चहा: रु. ६०.

बाहेर जाऊनही तीच बोंब म्हणून हा मध्यमवर्गीयपणाचा गुण बाजूला सारून विमानतळावरच सकाळची न्याहरी उरकली. दिल्ली विमानतळावरील सकाळच्या न्याहारीचा खर्च - रु. १०१३


अबब् ... हेच जर आम्ही घरून काही तरी करून अथवा पुण्याहून विकत घेऊन गेलो असतो तर किती पैसे वाचले असते. मग मनात हा पण करून आम्ही मध्यंतरानंतरच्या विमानप्रवासासाठी म्हणून CHECK-IN करण्यासाठी विमानतळामध्ये प्रवेश केला. विमानतळावर काही नवीन नवीन GAGDETS, हिरवळ पाहण्यासाठी थोडीफार इकडे तिकडे उंडराउंडरी केली आणि उत्तरार्थातील प्रवासाच्या सुरुवातीची वाट पाहत बसलो. तेवढ्या वेळात सुमितने त्याचे थोडेफार नोकरीचे काम उरकून घेतले. छोटूनानाने मायाजालावर थोडीफार भटकंती करून घेतली. दोनाचे चार हात झालेल्यांनी सौंदर्य पाहणे ही जिवंतपणाची खून आहे त्याचप्रमाणे ते कॅमेरामध्ये जतन ही झाले पाहिजेम्हणून कि काय एखाद-दुसरा जवानीवालीचा फोटो काढून घेतला.


Photo of a girl on Delhi Airport (In Inverted Colors)



मध्यंतर संपवून साधारण ११:३० च्या दरम्यान आम्ही उत्तरार्थाच्या विमानप्रवासास सुरुवात केली. विमानात प्रवेश केल्यावर हवाईसुंदरींच्या शृंगाराची तीच री ... प्रवासामध्ये मध्येच हवामान थोडे खराब झाल्याने विमान थोडेसे खालच्या उंचीवर घ्यावे लागले आणि आम्हास खिडकीतून निसर्गाचे विहंगम दृश्य पहावयास मिळाले. त्याचवेळेस पेशुभाईने केलेली फोटोग्राफी –







मी ज्या जागेवर बसलो होतो त्याच्या मागील आसनावर एक लई सेक्साड पोरगी बसली होती आणि तीही तोकड्या कपड्यांमध्ये. तिच्या शेजारी पन्नाशी गाठलेला एक माणूस. पण विमानातील आसनव्यवस्थेमुळे ***** ... काय हे दुर्भाग्य ...ये हमारे बारे मी ही क्यू होता है|



अशा पद्धतीने बदलत्या हवामानाचा/ढगांचा/ऊनसावल्यांचा खेळ पाहत पाहत आम्ही साधारण दुपारी ०१:३० च्या दरम्यान बागडोगरा विमानतळावर पोहचलो. आमच्या सामानाच्या बॅगा घेण्यासाठी म्हणून BAGGAGE CLAIM BELT जवळ थांबलो तर बराच वेळ झाला तरी आमच्या सामानाचा पत्ता नाही. माझ्या मनात पाल चुकचुकून गेली कि बुवा सामान दिल्ली विमानतळावर तर नाही राहिले ना? आणि साधारण २० मिनिटांनी आम्हाला आमचे सामान मिळाले. त्याच कालावधीत काहींनी गंगटोकला जाण्यासाठी गाड्यांची चौकशी केली. प्रीपेड टॅक्सीला साधारण रु. २१०० लागत होते पण योगायोगाने आम्हास १ इनोवा/INNOVA रु. १८०० मध्ये मिळाली आणि आम्ही आमचे सामान गाडीवर बांधून गंगटोक प्रयाणास सुरुवात केली.

 DELETED TEXT


गाडीत बसताना मी इथे नाही बसणार, तिथे बसणार, मला इथे बसायचे, तिथे बसायचे असे म्हणत म्हणत सामंज्यसपणाने जागा ठरवून आम्ही गंगटोक प्रवासास सुरुवात केली. मग गप्पागोष्टी, हास्यविनोद, हलक्या फुलक्या वादाच्या फैरी सोडत आम्ही एका ठिकाणी जेवायला थांबलो.

हॉटेलमधील  मधमाशांचे पोळे
जेवणाच्या वेळेस उठलेले मधमाशांचे पोळे
आम्ही 
आम्ही दोघी सिक्कीमी आणि आमचं खेळणं
मी सिक्कीमी

हॉटेलमध्ये आम्ही सिक्कीमचा एक पारंपारिक खेळ पाहिला. त्याचे नाव होते - शोह. या खेळामध्ये खेळणारी व्यक्ती दोन सोंगट्या एका लाकडी कटोरीमध्ये  घोळून समोर ठेवलेल्या चामड्याच्या तुकड्या/ताटली वर आदळते आणि आदळताना जोरात ओरडते. आणि खेळताना सगळेजण बिअर पित होते. खेळ पाहायला मजा आली. एकुणात हा खेळ आम्हाला महाराष्ट्रातील चल्लसाठ या खेळासारखा भासला - अगदी जसाच्या तसा जरी नसला तरी थोडेफार साम्य जाणवून आले. शोह या खेळाविषयी अधिक माहिती खालील पत्त्यांवर मिळेल -


जेवण झाल्यानंतर आम्ही आवली आव्हाडांच्या ओळखीच्यांबरोबर घडलेले किस्से ऐकत ऐकत पुढील प्रवासास सुरुवात केली. कधी कधी वाटते सगळी हास्यास्पद/कलंदर/बिलंदर व्यक्तिमत्वे सचिन आव्हाडालाच कशी भेटतात किंवा त्यांचा सचिनशी संबंध येतो.



या संपूर्ण प्रवासामध्ये असं जाणवून आले कि या डोंगराळ भागामध्ये साधारण आपल्या वेळेप्रमाणे संध्याकाळी ०४:३० – ०४:४५ वाजल्यापासून अंधार पडायला सुरुवात होते. आणि साधारण ०५:०० वाजता अंधार-भुडुक. बागडोगरा विमानतळ ते गंगटोक हे अंतर साधारण १२३ किलोमीटरचे पण खराब रस्त्यामुळे आम्हाला ०५:३० तास लागले.



या प्रवासादरम्यान आम्ही सहलीच्या नियोजनासाठी ज्याच्याशी संपर्क साधला होता त्या दिपकशी आमचा RANGE PROBLEM मुळे संपर्क होत नव्हता. आम्हाला राहण्याच्या सोयीबद्दल विचारून घ्यायचे होते. त्यात दिपकचे कोणीतरी नातेवाईक वारले होते त्यामुळे ... शेवटी गंगटोकजवळ आल्यावर दिपकचा फोन आला आणि पुढील गोष्टींची चर्चा झाली.
दीपक राय चा संपर्क क्रमांक: +९१ ९४३४१०३७७० आणि आमच्या गाडीचा चालक अरुण दत्ता चा संपर्क क्रमांक: +९१ ९४७४३९०९३७. शेवटच्या दिवशी दत्तानेच  आम्हाला गंगटोक ते बागडोगरा येण्यासाठी गाडीची सोय करून दिली.


आम्ही साधारण मध्यरात्रीच्या ०८:०० वाजता (तिथल्या वेळेनुसार) गंगटोकमध्ये पोहचलो. गाडीचालकास खुशी वगैरे देऊन हॉटेलमध्ये सामान ठेऊन चहा घेऊन आम्ही भटकंतीस बाहेर पडलो. कुठे तर? - प्रत्येक शहरात असतो अशा महात्मा गांधी/MG रोडवर. इथल्या थंडीबद्दल जेवढे ऐकले होते तेवढी थंडी काही जाणवून आली नाही. तसेच आम्हास इथे पोहचण्यास गंगटोकच्या वेळेनुसार उशीर झालेला असल्याने येथील बाजारही बंद झालेला होता.





मग हलकीफुलकी पोटपूजा करून आम्ही परत हॉटेलवर आलो.छोटू नानाने फोटोंसाठी लँपटाँप/ LAPTOP आणला होता. सगळे फोटो लँपटाँपवर टाकून सगळ्यांनी पाहून घेतले. फोटो पाहताना असे जाणवून आले कि फोटो थोडेसे खराब निघाले आहेत म्हणून कॅमेराचे SETTING बदलून घेतले. नंतर पत्ते, गप्पागोष्टी, नेहमी ठरल्याप्रमाणे छोटे सरकारांची चिडचिड - यावेळी जरा जास्तीच होती बर का - :) ... या चिडचिडीमुले मी तर पोट धरून गादीवर लोळून लोळून हसत होतो. आणि अशा दिवसभराच्या घडामोडींनंतर आम्ही उद्याचा विचार करीत करीत झोपेला आमच्या कवेत घेतले आणि निद्रिस्त झालो.


पहिल्या दिवसाचा एकूण खर्च - रु. २९७९.

- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) ( + ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ० )
गुरुवार, २१
/०४/२०११

२ टिप्पण्या: