येत्या मे महिन्यात मी २७ वर्षांचा टोणगा होणार आहे. आता वय वर्षे २७ म्हणजे लग्नाळलेले वय. मी अजून तरी आपल्या पारंपारिक पद्धतीनुसार मुली बघायला सुरुवात केलेली नाहीये. पण बुवा रोज रस्त्यावरची पाखरं पाहणं हा आता जणू छंदच होऊन बसलाय. पण होतंय काय कि काल परवा एखाद्या पोरीला पहिले कि नाही (खरं तर निरीक्षण हा शब्द योग्य ठरेल) हे आठवतच नाहीये. त्यात कहर म्हणजे सध्या प्रयेक गोष्टीची मोजमाप करण्याची सवय लागली आहे (घराच्या बांधकामामुळे प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करावे लागते ना ...). काल परवा पाहिलेल्या पोरीही आठवत नाहीयेत आणि त्यांची मापं ही (वाचकांनो, गैरअर्थ घेऊ नका हो. मला जाडी/हडकुळी/मध्यम असे म्हणायचे होते/आहे ... मी लहानपणापासून अजूनपर्यंत ब्रम्हचारी आहे ... तुम्ही गैरसमज करून घ्याल तर माझ्या लग्नाचे वांदे व्हायचे ...). म्हणुन म्हटलं कि बुवा चला मेंदूतील दोन चार कप्पे खाली करावेत म्हणजे सध्या आवश्यक असणाऱ्या ठिकाणी ते रिकामे झालेले कप्पे नवीन आठवणींसाठी वापरता येतील. मग म्हंटल दारूच्या आठवणींनीच सुरुवात करावी.
मला आज त्या दारूच्या आठवणी ओकायाच्या आहेत ... चला तर मग सुरुवात करूया ...
मी माझ्या लहानपणीच दारू पिलेल्यांची ज्वलंत उदाहरणे पहिली आहेत. मी पाहिलेल्या दारू पिलेल्यांचा अविर्भाव असा असायचा कि तो म्हणजे एक राजा आहे आणि बाकी सगळे चुत्त्या आहेत, त्याचे गुलाम आहेत. अशा दारुड्यांचे प्रताप म्हणजे रस्त्यावरून जाताना एखाद्याच्या घराण्याचा उद्धार करणे, 'अ' ची बाराखडी बरळणे, रस्त्यावर कशाही अवस्थेत पडणे, एखाद्याला हातात येईल त्या साधनाने/हत्याराने मारणे, एखाद्याला खड्ड्यात ढकलून देणे, कुणी काही म्हटलं कि कशाचीही कदर न करता सगळ्यांसमोर नागडे होणे.
लहानपणीची नशाच अशी होती कि भगवा झेंडा, शिवाजी, संभाजी म्हटलं कि कशाचीही पर्वा न करता बिनधास्त कुठेही कुठल्याही गटामध्ये सामील होणे. मी इयत्ता आठवीत असताना गंगा, यमुना, आणि सरस्वती नदीकिनारी बजरंग दलाचा कोणता तरी मेळावा होता. त्या मेळाव्यासाठी मी माझ्या एका नातेवाईकाच्या मित्रांबरोबर गेलो असताना मला पहिल्यांदा दारू पिण्याचा योग आला होता पण वर नमूद केलेली उदाहरणे मी स्वत डोळ्याने पाहिलेली असल्याने मी त्यावेळी दारू घेतली नाही आणि एवढ्या लवकर घरच्यांना धक्के द्यायलाही नको म्हटलं.
मी अकरावीच्या शेवटाला माझ्या एका मित्राबरोबर रात्रीच्या वेळेला पहिल्यांदा बियर घेतली तीही दुध पितात तसे. पिल्यापिल्या लगेच काही वाटले नाही पण साधारण ५-१० मिनिटांनी थोडेसे चक्कर आल्यासारखे वाटत होते. मग तिथून पुढे जसा योग येईल आणि पैसे गोळा होतील तसे पिण्याचे योग येत गेले.
बारावीमध्ये असताना काही जण असे भेटले कि जे बिअर म्हणजे नारळाचे पाणी असते, काही विशेष नसते असे म्हणायचे. मग मी माझे तत्वज्ञान सांगत असे - तसे नसते असे असते वगैरे वगैरे ... बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आम्ही रोज क्रिकेट खेळायचो. मग एकदा आम्ही सहा जण चालत माझ्या घरी निघालो होतो. वाटेत सगळ्यांनाच हुक्की आली कि बिअर प्यायची. मग सगळ्यांच्याजवळचे पैसे काढले - कुणाकडे ८ रु., कुणाकडे ३ रु., कुणाकडे ७ रु. मग सगळे मिळून ३८-४० रु. गोळा झाले असतील. हॉटेलमध्ये बिअरचे भाव पाहिले. आमच्या जमा झालेल्या पैशानुसार आम्ही फक्त Foster हीच बिअर घेऊ शकत होतो कारण तिचा दर ३५ रु. होता. बाकीच्या बिअरचा दर जास्त होता. वेटरने आम्हाला बिअर आणून दिली आणि ती बिअर आम्ही ६ जणांमध्ये घोटघोट मिळून पीत होतो. बिअर देऊन जाताना वेटरने आमच्यावर टोमणा मारला कि चमचे आणून देऊ का? आणि या बिअर साठी तो अपमान आम्ही पचवला.
बारावीच्या निकालानंतर तुझं तू माझं मी या तत्वावर आम्ही काहीजण पार्टीला गेलो होतो त्यामध्ये पिणारा मी एकटाच. हॉटेलमधून बाहेर पडलो तर एक ओळखीचे काका पानपट्टीवर. त्यांनी पाहू नये म्हणुन त्यांना चुकवून दुसरीकडे गेलो तरी त्यांनी पाहिलंच आणि न पाहिल्यासारखं केलं. मग नंतर त्यांनी ही घटना आमच्या मामांना सांगितली कि अमर बारमध्ये आला होता वगैरे वगैरे. पार्टी संपल्यानंतर घरी गेलो तेंव्हा घरचे सगळे झोपले होते. घरी आल्यानंतर आईचा आणि माझा झालेला छोटासा संवाद -
आई - दारू पिऊन आलास का?
मी - होय.
आई - माझी शपथ घेऊन सांग.
मी - तुझी शपथ. खरंच पिऊन आलो आहे. (किंचितसा सिरिअस पण उडवाउडवीचे उत्तर दिल्याप्रमाणे)
आई - म्हणजे नाही घेतलीस. (आईची भोळी माया/विश्वास)
मी - मग बस. आणि मग मी आईच्या शेजारी जाऊन विरुद्ध दिशेला तोंड करून झोपलो.
पुढे मग इंगीनिरिंगसाठी बारामतीला आलो. तिथे पहिल्या सत्रामध्ये (First Semister) पिण्याच्या बाबतीत सज्जन मुलाप्रमाणे वागलो. प्रथम सत्राचा निकाल - ३५९/६५० (दोन विषयात गटांगळी, गणित - ६९). प्रथम सत्राच्या निकालाच्यावेळी आमच्या ग्रुप व्यतिरिक्त इतरांशीही ओळख झालेली होती. मग त्यांच्याबरोबर गम मध्ये पार्टी केली. पुढे त्यांच्याबरोबर २-४ पार्ट्या केल्या. पुढे पुढे नवीन जोडीदार मिळाले त्यातील काही माझ्याच गावचे होते.
मग पुढे गोव्याला पिणे झाले. कधी बारामतीच्या कालव्याजवळ, रूमवर ... कधी कधी हॉट पिणे झाले ... मध्ये दोनचार वेळेला सिगारेट ही घेऊन झाले पण त्याचा काही Effect जाणवला नाही म्हणुन सोडून दिले ... माझा बिअरचा Favourate Brand - Canon 10000 / 5000 किंवा Hiaward 10000 / 5000 .
असेच एकदा हुक्की आली म्हणुन मी आणि आणखी दोघे मिळून माझ्या रूमवर बिअर घेऊन आलो. बिअर आणली होती त्यावेळेला बऱ्यापैकी भूक लागली होती. जर बिअर पिऊन गेलो तर मेस बंद होईल आणि परत जेवणाचे वांदे होतील म्हणुन बिअर रूमवर ठेवून आम्ही जेवायला मेसमध्ये गेलो. थोडेफार खाऊन घेतले आणि रूमवर परत येऊन बैठकीला बसलो. बिअर काही वेळ तशीच उघड्यावर राहिल्याने तिचा थंडपणा जरा कमी झाला होता. बऱ्यापैकी बिअर घेऊन झाल्यावर मला उलटी झाली आणि तेंव्हाच मला असे जाणवून आले कि आता आपली या क्षेत्रातून निवृत्तीची वेळ झाली आहे. मग रूम तशीच घाणेरड्या अवस्थेत ठेवून मी मित्राच्या रूमवर झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी रूम साफ केली पण बिअरच्या बाटल्या कॉटखाली तश्याच ठेवल्या आणि बाटल्यांची टोपणे चुकून खिडकीच्या खालच्या भागात तशीच राहून गेली. दुपारच्या वेळेला तावरे मास्तर होस्टेलवर चक्कर मारीत असताना माझ्या रुममध्ये हजर. रूमवर आल्यावर त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मला "तू$$? ... हं$$ ... असचं वागत जा ... " उपदेश करून गेले. नशीब माझे कि त्यांचे लक्ष्य दरवाज्याच्या बरोबर समोर असणाऱ्या बिअरच्या बाटल्यांच्या टोपणाकडे गेले नाही. नाही तर मला आणखी काय काय ऐकावे लागले असते कुणास ठाऊक. माझ्या आठवणीनुसार या किश्श्यानंतर माझे बिअर/दारू पिणे थोडेसे कमीच झाले.
मग पुढे आम्ही काहीजण तिसऱ्या वर्षी हॉस्टेल/कॉलेज च्या बाहेर राहायला आलो. तेंव्हाचे माझे रूम पार्टनर म्हणजे सचिन आव्हाड, सारंग गुजराथी, आणि समीर कवडे (काही दिवसांसाठी). यांचा असा समज होता कि मी जर रात्री रूमवर झोपायला आलो नाही म्हणजे मी प्यायला गेलो. मग दुसऱ्या दिवशी रूमवर आलो कि खरपूस समाचार. सचिन आव्हाड म्हणायचे कि दारू पिण्यापेक्षा गाढवाचा मूत प्यायचा गरम गरम, सकाळचा ताजा ताजा, त्यात अजून ते फुकट पण मिळतंय, दारूपेक्षा चांगलं लागलं वगैरे वगैरे ... त्यात सारंग आणि समीर त्याला साथ द्यायचे. अशावेळी मी शांत बसत असे आणि फक्त ऐकून घेत असे. त्यामुळे मला पिण्याच्याबाबतीत जरा जपूनच रहावे लागे. पण त्यांच्या या बोलण्याचा मला खरचं खूप फायदा झाला. तशा मी आव्हाड साहेबांकडून बऱ्याच शिव्या खाल्ल्या आहेत पण आई शपथ सांगतो हे गाढव वगैरे लईच बोचायचो. पण गुपचूप ऐकूनघ्यायचो. याबाबतीत त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत.
१५, १६, १७ नोव्हेंबर २००२ ला आमचे तृतीय सत्राचे सलग ३ Practicals / Orals होते - DBMS, OS, आणि Multimedia. आणि त्या तिन्हींमध्ये मी नापास होणार याचा मला ठाम विश्वास होता. १७ नोव्हेंबरला रूमवर आलो. बारामतीमधील सोलापूरच्या मित्रांना फोन केला कि प्यायला जायचे आहे कारण मला practicals खूप अवघड गेले आहेत, मी सगळ्या practicals मध्ये नापास होणार आहे, कदाचित YD पण होऊ शकतो आणि मला हे सगळं सध्या विसरायचे आहे. मग आम्ही जवळच्याच एका हॉटेलमध्ये जमा झालो. मी उलटी होईपर्यंत HOT पिलो पण मला तरीही सर्व काही जसेच्या तसे आठवत होते कि मला practicals अवघड गेले आहेत वगैरे वगैरे ... आमच्या तिघांचीही अवस्था बेकार झाली होती. आमच्याबरोबर एक जण न पिलेला होता म्हणुन बरे झाले नाही तर आमचे अवघड झाले असते. खरे तर practicals चा विषय विसरण्यासाठी मी प्यायला आलो होतो पण मला सर्व काही जसेच्या तसे आठवत होते आणि तेंव्हा मला असे जाणवले कि आपण उगीच घरच्यांचा पैसा वाया घालवतो आहोत आणि त्या दिवसापासून मी दारू पिणे सोडले ...
सोलापूरचा दारू सोडल्यानंतरचा किस्सा -
३१ डिसेंबर २००३ साजरा करण्यासाठी जर हॉटेल मध्ये गेलो तर खूप पैसे जातील म्हणुन बिअर आगोदरच आणून कुठेतरी ठेवणे आवश्यक होते. मी सगळ्यांना म्हटलं मी आमच्या घरी ठेवतो. घरी विषय काढू कि नको काढू कि नको आणि काढला तर कशी सुरुवात करावी असा विचार करत करत एकदाचे घरच्यांना विचारले. त्याचा छोटासा संवाद -
(आई स्वयंपाक करीत होती आणि वडील जेवत होते)
मी - आई, एक काम आहे.
आई - बोला.
मी - ३१ डिसेंबर साजरा करायचा आहे. सगळ्यांचा बिअर पिण्याचा विचार आहे. सगळे जण कधी तरी पार्टीच्यावेळी वगैरे बिअर पीत असतो. मी पूर्वी बिअर प्यायचो पण आता पीत नाही, बंद केली आहे.
आई - खरं सांग पितोस कि नाही ते.
वडील - तू पितो कि नाही.
मी - नाही. मी कधी कधी पीत होतो पण आता पीत नाही. ५/६ वेळा पिली आणि नंतर सोडून दिली.
आई/वडील - खरं ना ...
मी - होय. जर ३१ तारखेला बाहेर हॉटेल मध्ये गेलो तर खूप पैसे जातील म्हणुन आदल्या दिवशी बिअरच्या बाटल्या आपल्या घरी आणून ठेवायच्या आहेत.
आई - कोण कोण आहे ... कोण कोण पिते ... हा पितो का? तो पितो का? तो पण पितो का? ...
मी - होय. नाही. कधी तरी. मग आणून ठेवू ना?
आई - बघा ... ठेवा ... जरा व्यवस्थित ...
मी - मी सांगितले ना कि मी घेत नाही म्हणुन ...
वडील - ठीक आहे. पण जरा सांभाळून. सारखं सारखं घेत नाही ना पोरं ... घेत जाऊ नका पण घेतलं तरी प्रमाणामध्ये ...
मी - होय.
आई - मग सिगारेट पण घेत असशीलच?
मी - १-२ घेतली होती. आता काहीच घेत नाही ...
आई - बघ ...
मी - होय.
दारू/सिगारेट पिताना मला आलेले काही अनुभव किंवा सर्रास बोलले जाणारे शब्द किंवा काही फंडे -
- सिगारेट उजव्या हाताने घ्यायची नसते. डाव्या हाताने घ्यायची.
- माझ्यासाठी ... माझ्यासाठी एकच पेग
- तत्वज्ञान : समोरच्या पेग घे म्हटलं कि एक तरी पेग घ्यायचा नाही तर समोरच्याचा अपमान केल्यासारखे होते.
- Top to Bottom
- On The Rocks
- माझी ही वस्तू घे पण दारू आण
- अरे तू/तो माझा जिगर आहे/होता रे
- तत्वज्ञान: Liquor doesn't give answers to your questions but gives you chance to forget the questions (कदाचित sentence थोडेसे चुकले असण्याची शक्यता आहे)मला आज त्या दारूच्या आठवणी ओकायाच्या आहेत ... चला तर मग सुरुवात करूया ...

- तत्वज्ञान: Liquor सम्राट विजय मल्ल्याने गांधीच्या काही वस्तू परत भारतात आणल्या ...
- शेवटचा एकच पेग घेतो ... एकच ...
- बापाला पोर कशी काढायची शिकवतो होय ...
खरे सांगायचे दारू पिणारे नशेमध्ये अथवा चढली नसताना मुद्दामहून काय काय प्रताप गाजवतील काहीच सांगता येत नाही. त्यामुळे मला ओल्या पार्ट्यांना आणि पिलेल्यांबरोबर कुठेही जायला खरचं भीती वाटते. मी माझ्यापरीने जास्तीत जास्त असे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्येकालाच नाही म्हणता येत नाही ...
पुण्यातील एक किस्सा -
मी आणि सचिन आव्हाड एकदा मेसमध्ये जेवायला जात असताना एक बेवडा रस्त्याच्या कडेला पडत असताना आम्ही पाहिले. आम्हाला वाटले कि कदाचित त्या माणसाला फिट आली असेल/येत असेल म्हणुन आम्ही त्याच्याशी बोललो तर तो जवळच राहतो म्हणाला. मग आम्ही एक रिक्षा बोलावली त्याला त्याच्या घरी सोडण्यासाठी. रिक्षावाले आम्हाला सांगत होते कि कशाला नादी लागता त्यांच्या, पडूदेत इथेच. रिक्षामध्ये न्यायला काही नाही पण सगळी जबाबदारी तुमची. बरं म्हटलं आणि आम्ही त्या बेवड्याच्या घराकडे निघालो. घर जवळ येईपर्यंत साहेब एकदम शांत होते पण जसे घर जवळ आले तसे मला "ये बाळ्या तू हाय व्हय ... वगैरे वगैरे ... " म्हणायला लागला. लगेच आम्ही रिक्षा थांबवली आणि त्याला खाली उतरून तिथून परत निघालो. मग रिक्षावाल्यांनी त्यांचे काही किस्से सांगितले कि आमची पोर/माणसं अडकली कि कुणी मदतीला येत नाही ... कालच एक असा किस्सा घडला वगैरे वगैरे ... त्यादिवशी एक धडा मिळाला कि बेवड्यांच्या नादी लागायचे नाही ...
दारूच्या नशेच्या विचारात ... धन्यवाद!!!
- अमर गायकवाड
०२ फेब्रुवारी २०१०
shapatch
उत्तर द्याहटवाMitra Daru chi savay ekada lagali ki jaat nasate...
उत्तर द्याहटवाBaaki lihile mast aahe... Tuzya babatit aajun kahi details samajalya.
aasach lihit ja....Lai bhari vatale vachatana..... Keep it up... Bharpur lihi
aani to Ekada te GADDA prakaran pan sampaun tak na ethe