शनिवार, ११ डिसेंबर २०१० ला दुपारी ०२:१५ च्या सुमारास सवाई गंधर्व कार्यक्रमास निघताना कार्याक्रमाच्यावेळेस संध्याकाळच्या/रात्रीच्या खाण्याच्या सोयीसाठी आमच्या सहकारनगरमधील ठरलेल्या रुचिरा या भाजीपोळी केंद्रापाशी थांबलो होतो. तिथून जेवणाचे पार्सल घेऊन निघालो असताना एका पुण्याच्या डांबिसाने भाजीपोळी केंद्रासमोर माझ्या गाडीला धडक दिली. मी नियमानुसार डाव्या बाजूने नुकताच निघालो होतो आणि माझी गाडी पहिल्या गिअरमध्येच होती. भाजीपोळी केंद्रासमोर कार उभी असल्याने मी वाहनांचा अंदाज घेत पहिल्या गिअरमध्ये अगदी सावकाश निघालो होतो. तोपर्यंत हे पुणेरी डांबिस येऊन माझ्या गाडीला पुढून धडकले – थोडेसे जोरात पण अति जोरात नाही.
मी: काय हे? पटतंय का?
तो: (अरेरावीमध्ये) SORRY. पण तू पण SLOW यायला पाहिजे होते.
(माझी गाडी पहिल्या गिअरमध्ये होती आणि वेग जास्तीत जास्त १० कि.मी. प्रती तास)
मी: (चिडून आणि जोराने) तू WRONG साईडने येऊन माझ्या गाडीला धडकून वरून मलाच वरती अरेरावी करून मी SLOW यायला हवे होते? उतर खाली.
तो: (अजून भडकून) तू उतर वगैरे तर म्हणूनच नकोस.
(शिव्या) काय करणार आहे? तुला SORRY म्हटलंय ना?
मी: (जोराने) हे बघ, तू शिव्या वगैरे देऊ नकोस. मलाही शिव्या येतात. तू कुठे राहतोस सांग? मी बघतो काय करायचे ते? गाडीचा नंबर काय तुझ्या? (मी त्याच्या गाडीचा नंबर पहिला आणि शेवटचे चार अंक मोबाईलने डायल करून घेतले.)
तो: मी इथलाच आहे. सहकारनगरमध्ये राहतो. शिंदे हायस्कूलच्या पाठीमागे राहतो. जा तुला काय करायचे ते कर. बघतो मी पण काय करतो ते?
मी: असं का? ठीक आहे. बघतो मी पण काय करायचे ते.
मग साहेब पुढच्या आबाच्या ढाबा हॉटेलमध्ये जेवायला गेले. मी १ -२ मिनिटे विचार केला आणि जाणवले कि मी नियमाप्रमाणे रस्त्याच्या डाव्या बाजूने जात असताना आणि माझ्या गाडीचा वेग तशी १० कि.मी. असताना ह्यो डांबिस WRONG साईडने येऊन माझ्या गाडीला धडकतो आणि वर माझ्यावर अरेरावी करतो. मग म्हंटलं कि आता काही का होईना आज भांडायचेच. मग तिथेच गाडी बाजूला लावून मी हॉटेलमध्ये गेलो.
(थोड्याशा चुकीमुळे/दुर्लक्षपणामुळे किंवा माणूस त्याच्याच विचारात गुंतला असेल तर अशा पद्धतीचा अपघात होऊ शकतो. जर तो माझ्याशी व्यवस्थित बोलला असता तर ते तिथेच मिटले असते. पण ... फार पूर्वी माझ्याकडूनही WRONG साईडने जाताना अशी चूक झाली होती.)
हॉटेलमध्ये तो आणि त्याचा एक मित्र जेवणाची ऑर्डर देत होते.
मी: (तावातावाने) ए. चल तुझा Contact Number दे आणि तू कुठे रहातो ते सांग. मी बघतो काय करायचं ते.
तो: (अजून रागाने) तुला SORRY म्हटलंय ना. मग झालं ना. जा कि मग. मिटलं कि.
(शिव्या)
तू Contact Number आणि पत्ता वगैरे तर विचारूच नकोस. चल निघ. काय करायचं ते कर.
मी: (अजून रागाने) अरे तुझ्यात एवढंच कंड आहे, दम आहे तर दे ना तुझा Contact Number.
तो: तुला सांगितलं ना मी शिंदे हायस्कूलच्या पाठीमागे रहातो. जा, काय करायचं ते कर.
मी: तिथे रहातो तर मग दाखव ना Proof आणि दे ना Contact Number.
तुला द्यायचे नाही ना मग मी जातो पोलीस चौकीत आणि Complaint करतो. चल तुझ्या गाडीचा नंबर सांग. मग बघुयात काय करायचे ते.
तो: (मी तिथून निघताना)
तुला गाडीचा नंबर पाहिजे ना, घे – MH _ _ N _ _ _ _
जा तुला काय करायचे ते कर.
मी: (चालत असताना) करतो, मी काय करायचं ते करतो. त्याच्या गाडीजवळ येऊन मी त्याच्या गाडीचा नंबर स्वत:ला SMS केला.
तो: तुझ्या गाडीचा नंबर दे.
मी: घे ... तुला पण काय करायचे ते कर.
(मग त्याने माझ्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढला.)
तिथून निघताना मला असे जाणवले कि गाडीचे HANDLE थोडेसे वाकडे झाले आहे. मग Complaint करण्याचा विचार पक्का करून मी दत्तवाडी पोलीस चौकीत गेलो. तिथे गाडी लावताना गाडीचे HANDLE LOCK बसत नाही असे जाणवले.
मी: (पोलिसांना उद्देशून) काका, मला एक तक्रार नोंदवायची आहे. मग झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. ही घटना सहकारनगर भागात घडल्याने तक्रार तिकडे नोंदवावी लागेल असे त्यांनी सांगितले.
(सवाई गंधर्व महोत्सवामध्ये जागा पकडण्याची आजची जबाबदारी माझी असल्याने तिकडे लवकर पोहचायचे होते म्हणून मी त्या काकांना विचारून घेतले कि तक्रार उद्या नोंदवली तर चालेल का? ते म्हणाले, चालेल. पण आजचया आज केलेली उत्तम. मग पुढची प्रक्रिया/Procedure विचारून मी तिथून बाहेर पडलो.
१-२ मिनिटे विचार करून असे ठरवले कि आज काय व्हायचंय ते होऊ दे, सवाई गंधर्वला उशीर झाला तरी चालेल, जागा मिळाली नाही तरी चालेल पण Complaint करायचीच असे ठरवून मी सहकारनगर पोलीस चौकीकडे निघालो.)
सहकारनगर पोलीस चौकीत पोहचल्यावर तेथील पोलिसांना मी घडला प्रकार आणि गाडीच्या नुकसानाबद्दल सांगितले. २ मिनिटे बसल्यानंतर तो डांबिस या या हॉटेलमध्ये जेवायला बसला आहे म्हणून सांगितले. मग त्या पोलीस अधिकाऱ्याने माझ्याबरोबर एका हवालदाराला पाठवले आणि त्याला चौकीत घेऊन येण्यास सांगितले.
हवालदाराला घेऊन त्या हॉटेलमध्ये गेलो असताना तो डांबिस आणि त्याचा मित्र जेवत होते. ते दोघे जेवत असताना १-२ मिनिटे झाल्या प्रकाराबद्दल बोलून त्यांचे जेवण झाल्यावर बोलू असे म्हणून मी आणि हवालदार साहेब बाजूला बसलो. हे बोलत असतानासुद्धा तो डांबिस माजखोरपणेच बोलत होता. (हवालदार साहेबांना पाहून हॉटेल मालक त्यांच्याशी एकदम आदबीने जेवणार का वगैरे विचारत होता - :) )
आम्ही बाजूला बसल्यावर हवालदार साहेब मला समजावून सांगत होते कि, हा झाला प्रकार चुकून झालेला आहे, तुम्ही काही रोज भेटत नाही, समझोता करून मिटवून टाका, कुठे वाढवत नेता. जर Complaint केली तर तुम्हाला चौकीत यावे लागेल, त्याला यावे लागेल, दोघांची चौकशी होईल, आणि प्रकरण वाढत जाईल. त्यामुळे इथेच बोलून मिटवून टाका.
मी: काका, तो माजखोरपणे बोलत होता आणि अजूनही माजखोरपणेच बोलतोय म्हणून मी Complaint नोंदवायला चौकीत आलो. जर तो व्यवस्थित बोलला असता तर मी काहीही ना बोलता प्रकरण तिथेच मिटवले असते. पण ...
त्यांचे जेवण झाल्यावर –
हवालदार साहेबांची तीच री ... त्या डांबिसाची देखील माजखोरपणे तीच री ... मी SORRY बोललो होतो वगैरे वगैरे ... माझी पण परत तीच री ... तो जर माजखोरपणे बोलला नसता, त्या TONE मध्ये बोलला नसता तर ...
तो: हे बघ, मी अजूनही त्याच TONE मध्ये बोलू शकतो.
मी: हे बघ, तुला जे बोलायचे आहे ते इकडे हवालदार साहेबांशी बोल.
... आणि काही मिनिटे आमची परत परत तीच तीच री ... ओढून झाल्यावर नुकसान भरपाई देणे घेण्याचे ठरले.
मी: तुम्ही स्वत: (हवालदार, तो डांबिस, किंवा त्याचा मित्र) गाडीचे HANDLE LOCK बघा, एकदा गाडी चालवून बघा, आणि मग ठरवा. आपण एका तटस्थ Servicing Centre मध्ये जाऊयात आणि जो काही खर्च येईल ते पाहू.
त्याचा मित्र: Ignition Change ला रु. ३५० खर्च येतो. मी मागच्या आठवड्यातच बदलले आहे ...
मग मी आणि त्या डांबिसाने ओळखीच्यांना फोन करून किती खर्च येईल ते विचारून घेतले आणि रु. ४००-५०० खर्च येईल असे ठरले.
(तो पोरगा फोन करताना हवालदार साहेब म्हणत होते कि कशाला फोन करताय, घ्या मिटवून इथेच ...)
त्याच्या मित्राने रु. ५०० दिल्यानंतर मी त्याला रु. १०० परत दिले. त्यांनी ते “होय-नाही, होय-नाही, परत कमी जास्ती झाले तर तू Complaint करणार, त्यापेक्षा ...” असे म्हणत परत घेतले.
मी: कदाचित FORK OUT झालेले असू शकते तर आपण एखाद्या Servicing Centre मध्ये जाऊयात आणि Check करूयात.
तो: FORK OUT झाले नसणार आहे आणि झाले असेल तर – मी शिंदे हायस्कूलच्या पाठीमागे रहातो. तिथे आमचा मोठा बंगला आहे. माझं नाव सु. पवार. ऊ. पवार (पुण्याचे आमदार/खासदार) माहित आहेत ना. ते माझे काका आहेत. FORK OUT झाले असेल तर काय खर्च आला असेल ते सांग, घरी ये, आणि पैसे घेऊन जा.
(ढीचँग ... ढीचँग ... राजकारण्याचे पोरगं ... आपण कुणाशी भांडत आहोत ...)
हे एवढं सगळ झाल्यानंतर हे प्रकरण मिटले. नंतर मी हवालदार साहेबांना चौकीत सोडले. मी माझी बँग घेण्यासाठी चौकीत गेलो तर हवालदार त्याच्या साहेबांना सागत होता कि – तो पोरगा ऊ. पवारांचा नातू कि पुतण्या होता. नशीब मारलं नाही याला ...
चौकीतून बाहेर आल्यावर हवालदारांनी पुन्हा समजावण्याची तीच री ओढली – “तो पोरगा ऊ. पवारांचा कोणी तरी ...” ... तर मी पण माझ्या ओळखींचे उगाच पिल्लू सोडले – सोलापूरचे आमदार दि. माने हे माझे चुलत चुलते, माझा भाऊ पण पत्रकारितेत आहे, लोकसत्तामध्ये आहे, वगैरे वगैरे ...
पोलीस चौकीतून निघाल्यानंतर मी ओळखीच्या Servicing Centre मध्ये जाऊन गाडीची तपासणी केली. गाडीचे HANDLE डावीकडे ३-४ वेळा जोरात आदळल्यावर HANDLE LOCK व्यवस्थित झाले. Mudguard चाकाला थोडेसे घासत होते. चाकाला ४-५ लाथा घातल्यानंतर तेही थोड्याफार प्रमाणात व्यवस्थित झाले (पूर्णपणे दुरुस्त झाले नाही पण काही धोका नसल्याचे कळले). नंतर Servicing Centre वाला म्हणाला – FORK OUT आहे, जर वरचेवर झाले तर रु. १५०-२०० खर्च येईल, जर खोलावे लागले तर रु ४००-४५० खर्च येईल.
(प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर FORK OUT बद्दल काही बोलायच्या आधी मनात असा विचार येऊन गेला कि त्या पोराचे रु. ४०० इंटरनेटवरून त्याचा पत्ता शोधून एखादे पत्र लिहून कुरिअर/मनीऑर्डर ने परत करावेत. उगाच कशाला विनाकारण एखाद्याचा पैसा वापरायचा. ज्याच्या त्याच्या पैशाचा ज्याचा त्याला लखलाभ!
पण जेंव्हा FORK OUT बद्दल चर्चा झाली तेंव्हा असे ठरवले कि प्रथम गाडीच्या पुढच्या Servicing च्या वेळेस FORK OUT चा खर्च पहावा आणि मग उरलेले पैसे कुरिअर/मनीऑर्डर ने परत करावेत. २-४ दिवसांनी विचार केल्यानंतर असे जाणवले कि जर उरलेले पैसे कुरिअर/मनीऑर्डर ने पाठवले तर उगाच पुन्हा नवीन अडचणी यायच्या. मग असे ठरवले कि उरलेले पैसे त्या पोराच्या नावे माझ्या मित्राकरवी सहकारनगरमधील स्वामी समर्थ मंदिरात अर्पण करावेत – हे योग्य आहे कि नाही हे मात्र मी सांगू शकत नाही.)
गाडीची अशी डागडुजी करून मी तिथून सवाई गंधर्व महोत्सवाच्या ठिकाणाकडे प्रस्थान केले. तिकडे निघत असताना विचार केल्यानंतर असे जाणवले कि – आज जे काही घडलं तो माझा विजय होता कि मी एका प्रसिद्धी पावलेल्या राजकारण्याच्या पोराकडून वाचलो होतो? जर तो खरंच राजकारणी घराण्यातील असेल तर त्यामानाने त्याने माझ्यासमोर मी राजकारण्यांच्या ऐकलेल्या/पाहिलेल्या प्रकरणांनुसार/कथांनुसार माझ्यासमोर जरा कमीच माज केला ... असा विचार करीत करीत मी सवाई गंधर्व महोस्तवाच्या ठिकाणी पोहचलो आणि संगीत दुनियेत विलीन झालो ...
- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m) ( + ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ० )
शनिवार, १८/१२/२०१०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा