सध्याची परिस्थिती 'हम पाच हमारे पचास' सारखी किंवा जोपर्यंत वंशाला दिवा (मुलगा) मिळत नाही तोपर्यंत लेकरं हळजत (अपत्ये होऊ देणे) राहण्यायोग्य आहे का? फार पूर्वी म्हणजे इ.स.वी. सनापूर्वी 'हम पाच हमारे पचास' योग्य होते कारण त्यावेळेस राजे लोकांना साम्राज्यविस्तारासाठी आणि साम्राज्याच्या संरक्षणासाठी ते फायदेशीर ठरत होते. पण आताची परिस्थिती तशी आहे का? जर तुम्ही खेडेगावात गेलात तर बहुतांशीवेळा तुम्हाला हे जाणवून येईल कि वंशाला दिवा मिळेपर्यंत लेकरं हळजत राहणे आणि पुढे काय तर ह्योच वंशाचा दिवा मिसरूड फुटायला लागले किंवा २०-२५ शी गाठेपर्यंत फुटकळ पिण्याच्या मार्गी लागलेला, शेतीबाडी/संपत्तीच्या वाटणीसाठी अडून बसलेला वगैरे वगैरे असे चित्र दिसेल ...
माझा सोलापूरमध्ये एक मित्र आहे. जेमतेम ५-८ वी शिकलेला असेल. आता त्याला ३ पोरी आहेत. पण बायकोची इच्छा आहे कि पोरगा व्हावा त्यामुळे बायकोचे अजून Operation केलेले नाहीये. आता याचेच २ भाऊ घरातून वेगळे झाले आहेत आणि घराचा सगळा भर याच्यावरच आहे. दोघे नवरा बायको १६-१६ तास राबतात. कमावणारी तोंडे २ आणि खाणारी तोंडे १०. अशाने कसा काय संसाराचा व्यवस्थित मेळ बसेल. घरी वंशासाठी ३ दिवे होते, त्यातील २ दिवे आईबापाला सोडून मोकळे देखील झाले आणि तरीही हा वंशाला दिवा मिळावा म्हणून धडपडतोय याचेच नवल वाटते. या विषयावर त्याच्याशी बोलून हि झाले पण बायकोची इच्छा कोण काय करणार? ...
रा. धो कर्वे यांनी भारत पारतंत्र्यात असतानाच याविषयी विचार केला होता आणि त्याबद्दल जनजागृती करण्यास सुरुवातही केली होती. जनजागृतीसाठी त्यांनी अपत्य देखील होऊ दिले नाही. पण त्यांच्यापोटी केवळ उपेक्षाच आली. ज्या नेहरूंचे प्रत्येक रस्त्याला, प्रत्येक मैदानाला नाव दिले जाते तेच त्याकाळी म्हणाले होते कि आपल्याला संतती नियमनाची गरज नाहीये. त्यात अजून आपली शिक्षण पद्धती इतकी ग्रासली आहे कि प्रत्येक आई बापाला आपल्या पाल्याला डॉक्टर/इंजिनियर च करावे वाटते आणि त्यामुळे प्रत्येकजण पुस्तकी ज्ञानाच्या पाठीमागेच लागला आहे. शिक्षक हि तसेच आणि पालक हि तसेच. खरे पाहता शिक्षणामध्ये भावी आयुष्याची गरज काय आहे हे शिकवणे अत्त्यावश्यक आहे. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ...?
जर शिकलेल्यांनी आणि थोडीशी समज असणाऱ्यांनी असे केले तर -
एक अपत्य होऊ द्यायचे. ४-५ वर्षांनी एक अपत्य दत्तक घ्यायचे. जर पहीलं अपत्य मुलगा असेल तर मुलगी दत्तक घ्यायची आणि जर मुलगी असेल तर मुलगा दत्तक घ्यायचे. असे करण्याने एका भावाला एक बहिण, एका बहिणीला एक भाऊ, एखाद्याला दत्तक घेण्याच्या रूपाने समाजकार्य, भारताच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याचे समाजकार्य, अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या संस्थेवरील थोडासा भार कमी करण्यासाठी मदत होऊ शकेल. आणि हे असे एकट्या दुकट्याने करून चालणार नाही तर असे कार्य आपापल्या मित्रांच्या समूहाने केल्याने त्याबद्दल धास्तीही वाटणार नाही. आणि समाजासाठी तो एक आदर्श ठरेल.
जर आपण भौतिक शास्त्रातील एका समिकरणाकडे पाहिले तर आपल्याला जाणवून येईल कि संतती नियमन किती गरजेचे आहे ते.
E = m*c2
E = Energy can neither be created nor be destroyed. It converts from one form to another form. It means that 'E' is always constant.
c = Speed of Light which is also constant.
m = Mass/Weight of Earth. As 'E' and 'c' are constants, 'm' has to be constant.

आता तुम्हीच व्यवस्थित विचार करा - जर तुम्ही 'हम पाच हमारे पचास' / 'लेकरं हळजतच' रहाल तर त्यांच्या राहण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी नवीन जागा/घरे तयार कराव्या लागतील. 'm' तर constant आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या सोयीसाठी जंगले/डोंगरे पाडावी लागतील. 'm' ला constant ठेवण्यासाठी निसर्गालाच काही पाऊले उचलून कुठे तरी भूकंप, त्सुनामी लाटा तयार कराव्या लागतील. या सर्व प्रकारामुळे पर्यावरणामध्ये बदल होऊन पुढे ते आपल्यालाच भोगावे लागणार आहे.
आता तुम्हीच ठरावा काय करायचे ते - 'हम पाच हमारे पचास' कि 'हम दो हमारा एक + एक'?

... आणि सरतेशेवटी मी अशी आशा करतो कि पुढे माझ्या आयुष्यात येणारी माझी अर्धांगिनी तरी माझे हे म्हणणे मान्य करेल!
- अमर गायकवाड (a v g a i k w a d @ g m a i l . c o m ) ( + ९ १ ९ ९ ६ ० ७ ८ ८ २ ८ ० )
मंगळवार, २३/११/२०१०
it is well written.... in some sense it may be true but there r many sides of this issue... please look in all perspective.... e.g. current religious structure (for this perspective please find what RSS think for the same)
उत्तर द्याहटवाThanks for your comments.
उत्तर द्याहटवा